नांदेड : अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव शिवारात बोगस बियाणे (Bogus Seed) तयार करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावाोनंतर कृषी विभागाने (Agriculture Department) कंपनीवर शनिवारी (ता. २८) छापा (Raid) टाकला. यावेळी कंपनीत अनेक प्रकारचे बोगस बियाणे तयार करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी अर्धापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नांदेड शहराजवळील अर्धापूर रोडवर पिंपळगाव शिवारात एका गोदामात मयूरी सीड्स आणि बुलेट ॲग्री प्रॉडक्ट्स ही कंपनी बोगस बियाण्यांचे उत्पादन (Seed Production) करत होती. कृषी विभागाने छापा टाकून या कंपनीचा भंडाफोड केला आहे. या कंपनीत सोयाबीन, उडीद, हरभरा ही बियाणे तयार केली जात होती. त्यामुळे गोदामातील सर्व बोगस बियाणी जप्त केली आहेत. छापा टाकल्यानंतर गोदामात १०० क्विंटल सोयाबीन, २० क्विंटल हरभरा, १०० क्विंटल उडीद, पॅकिंग मशिन, ग्राइंडर मशिन जप्त केले आहे. या वेळी कंपनीत २० कामगार काम करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या कामगारांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कृषी विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून संबंधित कंपनी सील करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी अनिल शिरपुरे आणि नांदेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने हा बोगस बियाणे साठा उघडकीस आणला. या कंपनीत सोयाबीन, उडीद, हरभरा इत्यादी बियाणी तयार केली जात होती. या कंपनीने या पूर्वी अशा किती बियाण्यांची विक्री केली आहे आणि अजून कोणत्या प्रकारचे बियाणे तयार केले जात आहे का, याची कसून चौकशी केली जात आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक कपिल आगलावे यांनी दिली आहे.
मयूरी सीड्स या नावाने बोगस बियाण्यांची विक्री करत होती. तर बियाणे कंपनीचा पत्ता, कंपनीचा बोर्ड, बॅग वरील ठिकाण, लॉट नंबर, बॅच नंबर अशा अनेक चुका या कंपनीत कृषी विभागास निदर्शनास आल्या आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अनिल शिरपुरे यांनी दिली आहे. दरम्यान, बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अशा कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडप्रणीत शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.