Agri Service Centers: जालना तालुकास्तरीय गुण नियंत्रण निरीक्षक व भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने व नियमित तपासणी मध्ये अनियमितता निदर्शनास आल्याने एकूण ६४ कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यावर कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांनी कळविले आहे..यामध्ये बियाणे निलंबन १, बियाणे रद्द १, खते निलंबन ५४, खते रद्द २ व कीटकनाशके निलंबन ६ अशा एकूण ६४ कारवायांचा समावेश आहे..Fertilizer Shop License Suspension: परभणी जिल्ह्यातील ९ खत विक्री केंद्रांचे परवाने निलंबित.याशिवाय खत उत्पादक कंपनी व कृषी सेवा केंद्र चालक यांच्यावर पाच पोलीस स्टेशनमध्ये विना परवाना रासायनिक खतांचे व जैव उत्तेजक खतांचा उत्पादन, साठा व विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. .Agri License Suspension: छत्रपती संभाजीनगरमध्ये बियाण्यांचे १७, खताचे ८९ परवाने निलंबित.१ एप्रिल २०२६ पासून गुण नियंत्रण निरीक्षक व काही ठिकाणी भरारी पथक मार्फत आजपर्यंत एकूण ८७ कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये अनियमितता आढळून आलेल्या ४१ कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. .त्यापैकी १७ एप्रिल रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयात १० कृषी सेवा केंद्राची सुनावणी घेण्यात आली असून ९ कृषी केंद्राच्या परवान्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.