MLA Dilip Mohite  Agrowon
ॲग्रो विशेष

Nature Conservation : देवराया अधिक समृद्ध व्हाव्यात ः आमदार मोहिते

Climate Change : जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हे जगाला भेडसावणारे प्रश्‍न असून, याचा थेट दुष्परिणाम शेती, शेतकरी, मानव आणि पशुधनाच्या आरोग्यावर होत आहे.

Team Agrowon

Pune News : जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल हे जगाला भेडसावणारे प्रश्‍न असून, याचा थेट दुष्परिणाम शेती, शेतकरी, मानव आणि पशुधनाच्या आरोग्यावर होत आहे. भविष्यात हे दुष्परिणाम रोखण्यासाठी पर्यावरण संवर्धन गरजेचे आहे.

आपल्या पूर्वजांना जंगलांचे महत्त्व अधिक होते. म्हणून त्यांना देवराई उभारल्या आणि त्यांचे संवर्धन केले. मात्र आपण अधिक शिक्षित होऊन सुद्धा पर्यावरण संवर्धनाबाबत गंभीर नाही. अशी खंत आमदार दिलीप मोहिते यांनी व्यक्त केली.

जुन्नर वनविभागातील जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर या चार तालुक्यांतील १०० देवरायांच्या माहितीचे संकलन असणाऱ्या ‘निसर्ग संवर्धनाचा समृद्ध वारसा - ‘देवराई’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच आमदार मोहिते यांच्या हस्ते झाले.

या वेळी जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ. सविता संजयकुमार रहांगडाले आणि प्रा.डॉ. संजयकुमार रहांगडाले हे उपस्थित होते.

उपवनसंरक्षक सातपुते म्हणाले, ‘‘जुन्नर वन विभागात १०० देवराई असून, त्या देवरायांमधील जैवविविधतेची नोंद पुस्तकरूपी करण्याचा उपक्रम वन विभागाने घेतला आहे. या नोंदी भविष्यातील विद्यार्थी संशोधकांना दस्त स्वरूपात उपलब्ध होणार आहे.

तसेच हे पुस्तक विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाप्रती संवेदनशीलता जागृत करणारे राहील. पर्यावरणाप्रती संवेदनशील पिढी या पुस्तकातून निर्माण होईल.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास मुसळे यांनी केले. आभार संदेश पाटील यांनी मानले.

मानवाचा देवरायांबद्दल बदलणारा दृष्टिकोन व पर्यावरणीय बदलामुळे देवराया व त्यामधील जैवविविधता नष्ट होत चाललेली आहे. देवरायांचे बदलते स्वरूप व जैवविविधता संवर्धन ही काळाची गरज आहे. देवरायांच्या अभ्यासावेळी या १०१ देवरायांमध्ये ८१५ सपुष्प वनस्पती, ३६ नेचेवर्गीय वनस्पती व १०२ वन्यप्राण्यांची नोंदी आढळून आल्या.

सदर १०१ देवराया मानवास सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, आर्थिक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांचा वारसा भविष्यासाठी जपण्यासाठी त्यांचे संवर्धन व त्यावर संशोधन करणे आवश्यक आहे.

- प्रा. डॉ. संजयकुमार रहांगडाले, पुस्तकाचे लेखक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Reservation: न्यायालयाच्या नियमांचं पालन करा; जरांगे यांचं आंदोलकांना आवाहन

Qureshi Community Protest : कुरेशी समाजावरील अन्याय दूर करा

Onion Storage: कांदा साठवणीचे तंत्र, तज्ज्ञांचा सल्ला

Crop Damage Survey : पंचनामे बाजूला ठेवून तत्काळ मदत करा

Kharif Sowing : खरिपाच्या पेऱ्यात १५ हजार हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT