Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Food Security Mission : अक्कलकोट तालुक्यात ३५० एकरांवर सोयाबीन, तूर पिकांची प्रात्यक्षिके

Soybean Seed : या प्रात्यक्षिक कार्यक्रमात निवड केलेल्या शेतकऱ्यांना नुकतेच बियाण्यांचेही वाटप करण्यात आले.

Team Agrowon

Solapur News : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या आद्यरेखा प्रात्यक्षिक अंतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने अक्कलकोट तालुक्यातील काजीकणबस, किणीवाडी, चुंगी, किणी आणि कुरनूर या पाच गावांमध्ये सोयाबीन आणि तूर या पिकांच्या प्रशिक्षण व प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. त्यात २२५ एकरांवर सोयाबीन आणि १२५ एकरांवर तूर अशा पद्धतीने ३५० एकरांवर ही प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत.

या प्रात्यक्षिक कार्यक्रमात निवड केलेल्या शेतकऱ्यांना नुकतेच बियाण्यांचेही वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे हे होते. सोयाबीन पीक प्रात्यक्षिक अंतर्गत शेतकऱ्यांना सोयाबीनचा सुधारित वाण फुले संगम, बीज प्रक्रियेसाठी आवश्यक जिवाणू संवर्धक खते तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते देण्यात आली.

तूर आद्यरेखा प्रात्यक्षिक कार्यक्रमांतर्गत तुरीचा सुधारित वाण गोदावरी, जिवाणू संवर्धक खते व सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त झिंक सल्फेट फेरस सल्फेट व गंधक ही खते शेतकऱ्यांना देण्यात आली.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

या वेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यात अमोल शास्त्री यांनी बीजप्रक्रिया प्रत्यक्ष कशी करायची, याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखविले. समाधान जवळगे यांनी तूर व सोयाबीन पिकातील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. प्रदीप गोंजारी यांनी समूह आद्य रेखा प्रात्यक्षिक कार्यक्रमाचा हेतू सांगितला. डॉ. तांबडे यांनी सोयाबीन, तूर पीक उत्पादन वाढीची पंचसूत्रीची माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra ST Bus Service Issues: राजकारणासाठी एसटी प्रवासी वेठीला

MAGNET Projects Schemes: ‘मॅग्नेट’अंतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा

Neem Research Centre: भिडीत कडुलिंब संशोधन केंद्र होणार

MSCB Profit: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला ७०२ कोटींचा नफा

NABARD Experience Centre: मुंबईत नाबार्डच्या अनुभव केंद्राचे उद्घाटन

SCROLL FOR NEXT