Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Water : धरणग्रस्तांसाठी उजनीचे पाणी राखीव ठेवण्याची मागणी

Water Reservation : सध्या तरतूद नसतानाही बेकायदेशीररीत्या उजनी धरणातील पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे, असा आरोप उजनी धरणग्रस्त बचाव समितीच्यावतीने करण्यात येत आहे.

Team Agrowon

Pune News : सध्या तरतूद नसतानाही बेकायदेशीररीत्या उजनी धरणातील पाणी नदी पात्रात सोडण्यात येत आहे, असा आरोप उजनी धरणग्रस्त बचाव समितीच्यावतीने करण्यात येत आहे. उजनी धरणांमध्ये मर्यादित पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे, धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाणी राखीव ठेवावे व ज्याप्रमाणे उजनीतून पाणी सोडले जाते.

त्याचप्रमाणे इतर धरणांतूनही उजनी धरणांमध्ये पाणी सोडावे, अशी मागणी उजनी धरणग्रस्त बचाव समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप यांनी केली आहे. चालू वर्षी उजनी धरण केवळ ६६ टक्के भरले होते. तर सध्या उजनी धरणांमध्ये केवळ ४४ टक्के पाणीसाठा आहे. उजनी धरणांवर शेतीसह अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजनाही अवलंबून आहेत.

पर्जन्यमान कमी असल्यामुळे पाण्याचा वापरही वाढला आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याचे नियोजन काटेकोरपणे करण्याची आवश्यकता आहे. २०१५ मध्ये उजनी धरणांमध्ये कमी पाणीसाठा असतानाही सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी नियोजनाच्या माध्यमातून परिस्थिती हाताळली होती व जूनपर्यंत शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून दिले होते.

चालू वर्षीही धरणातील पाण्याची स्थिती गंभीर असून, पाण्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. धरणातील पाण्याची स्थिती गंभीर असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी उजनी धरणातील पाण्याचे नियोजनशून्य पद्धतीने पाणी वितरण केले जात असल्याचा आरोप धरणग्रस्त शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

उजनी धरणांतील पाणी जसजसे कमी होत आहे तसतसा शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढू लागला असून, उजनी धरणग्रस्तांसाठी १ जूनपर्यंतच्या वापरासाठी उजनीतील पाणी राखीव ठेवण्याची मागणी उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT