Chara Chhavani Agrowon
ॲग्रो विशेष

Chara Chavani : जुन्नरच्या पूर्व भागात चाराटंचाई ; चारा छावणी सुरू करण्याची मागणी

Cattle Camp : पाऊस न पडल्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये चाऱ्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत. वाढलेल्या किमतीत पशुखाद्य खरेदी करणे शेतकऱ्यांना न परवडणारे झाले आहे. अशातच पावसाने दडी मारल्यामुळे दूध उत्पादकांपुढे चाऱ्याचे संकट निर्माण झाले आहे.

Team Agrowon

Pune News : पावसाचे तीन महिने लोटली तरी पुरेसा पाऊस पडलेला नाही. जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, बेल्हे, आळे, आणे, नळावणे, बोरी, जाधव वाडी, शिंदेवाडी, उंच खडक, रानमळा आदी गावांत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होऊ लागला आहे. त्याचा परिणाम दुग्ध व्यवसायावर होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून होत असून, तालुक्यात चारा डेपो त्वरित सुरू करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी आमदार अतुल बेनके यांच्याकडे केली आहे.

पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनची पिके कोमेजून गेली आहेत. पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असून, फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी टँकरद्वारे विकत पाणी आणून फळबागा जगवण्याचा शेतकरी प्रयत्न करत आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. अनेक बोअरवेल बंद पडले अवस्थेत आहेत. पाण्याचे संकट ओढवल्यास दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. पाऊस न पडल्याने सध्याच्या परिस्थितीमध्ये चाऱ्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्याचबरोबर पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत. वाढलेल्या किमतीत पशुखाद्य खरेदी करणे शेतकऱ्यांना न परवडणारे झाले आहे. अशातच पावसाने दडी मारल्यामुळे दूध उत्पादकांपुढे चाऱ्याचे संकट निर्माण झाले आहे.

जुन्नर तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळ जाहीर करावा व तातडीने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गणेश दूध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब हाडवळे यांच्यासह लक्ष्मण बंगाळे, गोविंद औटी, किरण औटी यांनी दिला आहे.

विहिरी, बोअरवेल कोरडेठाक

जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबीन पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. पण सध्या पाऊस नसल्यामुळे पूर्ण पिके कोमेजून गेली आहेत. सोयाबीन पेरणीसाठी मशागत करून बी-बियाणे, खतांचा वापर करून ही केवळ पाण्याअभावी पिके कोमेजून जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांकडे विहिरी, बोअरवेला पाणी नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Sugarcane Protest: एफआरपी थकित असताना ८ कारखाने कसे सुरु झाले?, कोल्हापुरात १४ संघटनांचे हातात चाबूक घेऊन आंदोलन

Water Scarcity: जलसंकटाचे सावट

Paddy Harvest: चंदगड तालुक्यात पावसाच्या धास्तीने भात कापणी वेगात

Ativrushti Madat: अतिवृष्टीच्या मदतीचे ७० टक्के वितरण

Agrowon Podcast: शेवग्यातील तेजी टिकून; मेथीचे दर टिकून, सिताफळ दरात नरमाई, गाजराला उठाव तर मुगाचा भाव दबावातच

SCROLL FOR NEXT