Onion  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार दर देण्याची मागणी

टाकाऊ वस्तू अथवा पेपरच्या रद्दीलाही कांद्यापेक्षा जास्त भाव आहे.

Team Agrowon

Baramati News : टाकाऊ वस्तू अथवा पेपरच्या रद्दीलाही कांद्यापेक्षा जास्त भाव (onion Rate) आहे; परंतु शेतकऱ्याने कष्टाने पिकलेला कांदा मातीमोल भावाने (onion bajarbhav) विक्री होत आहे, असे होत राहिले तर शेतकऱ्याने जगायचे कसे ते सांगावे.

तसेच शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमीभाव (MSP) द्यावा, या मागणीचे निवेदन गुरुवारी (ता. २) राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने बारामतीच्या तहसीलदारांना देण्यात आले.

ॲड. अमोल सातकर यांनी सांगितले, की या वर्षी राज्यात कांद्याचे उत्पादन चांगले झाले असून, बाजारपेठेत कांद्याची आवक चांगली आहे. दुर्दैवाने शेतकऱ्यांचा कांदा मातिमोल भावाने विकला जात आहे.

शेतकऱ्यांना कांदा पिकविण्यासाठी प्रती किंटल १००० ते १२०० रुपये खर्च येतो. परंतु आज बाजारात ५०० ते ६०० रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी होताना दिसत आहे.

तरी, राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति क्विंटल किमान ३ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा.

याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष अरविंद देवकाते, काकासाहेब बुरुगंले, सोशल मीडिया प्रमुख शैलेश थोरात, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदीप चोपडे, दादासाहेब भिसे, स्वप्नील जगताप, अरुण लोहार, रेवण कोकरे, विजय मोटे, निखील दांगडे, श्याम घाडगे, वैभव पाटील, शिवाजी थोरात आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Prices: सोयाबीन ठरणार ‘गोल्डन बीन’

India Rice Export: ‘यूएसडीए’ने घटवला भारतीय तांदूळ निर्यातीचा अंदाज

Global Economy: जागतिक विकासदर घटण्याचा अंदाज

Delhi Protest Restrictions: पोलिस दिल्लीचे आणि मुंबईचे...

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

SCROLL FOR NEXT