Agriculture Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Pump : शेतकऱ्यांना कृषिपंपांची सुधारित वीजबिले देण्याची मागणी

Electricity Bills : खानदेशात वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषिपंपांची वीजबिले देताना त्यावर सध्या किती दर आकारला, वीजबिल माफ केले आहे,

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषिपंपांची वीजबिले देताना त्यावर सध्या किती दर आकारला, वीजबिल माफ केले आहे, याचे विवरण द्यावे, अशी मागणी केली जात आहे. शासनाने पाच व सात अश्वशक्तीच्या कृषिपंपांना वीजबिल माफ केले आहे.

पुढे निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर प्रशासन दखल घेणार नाही. वीजबिले भरण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात. मध्यंतरी काही गावांत कृषिपंपांचे वीज संयोजनही बंद करण्याचे, नादुरुस्त रोहित्र थकबाकी भरल्याशिवाय न देण्याचे आडमुठे धोरण वीज कंपनी राबवीत होती.

शेतकरी फक्त आठ तास कृषिपंपांसाठी वीज वापररात, रोहित्र दुरुस्ती केली जात नाही, वीजपुरवठा अधूनमधून खंडित होतो, त्यात कृषिपंप कमी दाबाची वीज किंवा इतर अडचणींमुळे नादुरुस्त होतात, हा सर्व तोटा भरून शेतकऱ्यांची कृषिपंप वीजबिले दुरुस्त किंवा साधारित करून द्यावीत व वीजबिल माफीचा लाभ दिला जावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

जळगावात यावल, जळगाव, चोपडा, धरणगाव, अमळनेर, चाळीसगाव आदी भागांत शेतकऱ्यांना कृषिपंपांची वीजबिले शेतकऱ्यांना मागूनही मिळत नाहीत. खरिपाची तयारी सुरू असतानाच अनेक वर्षांनंतर बिले का दिली, बिले व्यवस्थित करून का दिली नाहीत, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tambera: फुलोरा ते घाटे अवस्थेत हरभऱ्यावर तांबेराची शक्यता; नियंत्रणासाठी २ टिप्स

Fishing Crisis: हवामानाचा मासेमारीला फटका

Modern Farming Technology: शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज

Local Body Elections: चाकूर तालुक्यात दोन अर्ज अवैध

Sugarcane Crushing Season: सोलापूर विभागात दीड कोटी मे.टन उसाचे गाळप

SCROLL FOR NEXT