Agriculture Pump Theft : कृषिपंपांच्या केबल, ठिबक चोरीचे सत्र थांबेना

Agriculture News : खानदेशात सर्वच भागांत कृषिपंपांच्या केबल, ठिबक व शेतातील अन्य शेतीसंधीच्या यंत्रणा चोरीचे सत्र सुरूच आहे.
Agriculture Pump
Agriculture PumpAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात सर्वच भागांत कृषिपंपांच्या केबल, ठिबक व शेतातील अन्य शेतीसंधीच्या यंत्रणा चोरीचे सत्र सुरूच आहे. हे सत्र थांबत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी पोलिसांना अनेकदा सूचना, तक्रार, निवेदने दिली, पण दखल घेतली जात नसल्याने अडचणी आहेत.

खानदेशात तापी काठालगत नंदुरबारातील तळोदा, अक्कलकुवा, शहादा, नवापूर, धुळ्यातील शिरपूर, जळगावातील यावल, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर तसेच जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, साक्री, नंदुरबारातील नंदुरबार आदी भागात शेतांतून ठिबक व पाइप, लोखंडी यंत्रणा, कृषिपंपांचे स्वीच, कॉपर केबल आदी यंत्रणा चोरण्याचे प्रकार सुरूच आहेत.

Agriculture Pump
Agriculture Pump Theft : शेतात पाईप, सिंचन यंत्रणांची नासधूस, चोरीचे प्रकार

हे प्रकार थांबलेले नाहीत. केबल चोरीच्या घटनांत वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. मागील काही दिवसात चोपड्यातील सनपूले, वर्डी कठोरा, कुरवेल, धनवाडी, गरताड आदी गावांतील शिवारातून कृषिपंपाच्या केबलची चोरी झाली आहे. तसेच चोरांनी फ्युजपेटी व अन्य साहित्यांची तोडफोड केली आहे.

सनपुले शिवारातील शेतकरी मच्छिंद्र पाटील, श्याम पाटील, अजित पाटील, आधार पाटील, वर्डी शिवारातील अमोल पाटील, आधार पाटील यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या केबलची चोरी झाली आहे. चोरटे मध्यरात्री हा प्रकार करतात. केळी, पपई, भाजीपाला पिकांना विद्राव्य खते देण्यासह फवारणीला पाण्यासाठी कृषिपंप सुरू करावे लागतात. परंतु केबलची चोरी झाल्याने कृषिपंप सुरू कसे करणार, असा मुद्दा आहे. नवी केबल व यंत्रणेसह दुरुस्तीसाठी मोठा खर्च येतो.

Agriculture Pump
Agricultural Pump Theft : कळवणमध्ये कृषिपंप चोरट्यांचा धुमाकूळ

याप्रकरणी चोपड्यातील शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, किरण गुर्जर, अजित पाटील, श्याम पाटील आदी शेतकऱ्यांनी पोलीसात तक्रार केली आहे. चोपडा येथील पोलिस निरीक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी लवकरात लवकर तपास करून चोरीचे सत्र थांबवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना भुर्दंड

केबलची चोरी झाल्यास नवीन केबल खरेदी, कूपनलिकेतील कृषिपंप काढण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च येतो. तसेच अन्य यंत्रणेची तोडफोड झाल्यास अन्य खर्चही करावा लागतो.

चोपडा येथील पोलिस निरीक्षक कावेरी पाटील यांना शेतकरी संघटनेने निवेदन दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, किरण गुर्जर, विनोद धनगर, शाम पाटील, सचिन डाभे, अजित पाटील, कमलेश पाटील स्वप्नील पाटील, सुभाष पाटील, विजय पाटील, दिलीप पाटील, मंजूषा पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com