Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Water Issue : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पुन्हा पेटणार? धरणांतून जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची मागणी

Jayakawadi Dam : मराठवाड्यात पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील धरणांतून जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची होऊन लागली आहे.

Swapnil Shinde

Jayakawadi Project : भर पावसाळ्यातही (Rain)माॅन्सूनच्या पावसाने दडी मारल्याने मराठवाड्यात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. खरीप हंगामातील पिके पावसाअभावी करपली आहेत. तसेच जलसाठ्यांनी तळ गाठल्याने ऑक्टबरपासूनच अनेक टँकर्सने पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धऱणात पाणीसाठा घटल्याने तातडीने पाणी सोडण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण आणि भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे केली आहे.

यंदा मान्सून उशिरा आला, त्यात संपूर्ण पावसाळ्याचा हंगाम कोरडा गेला. सप्टेंबरअखेरीस पडलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक प्रकल्पामध्ये अल्प प्रमाणआत साठा आहे. मराठवाड्यात ८ जिल्ह्यांमधील ७६ तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात मराठवाड्याची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडी धरणात केवळ ४७ टक्के पाणी साठा आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड चिंतेत पडले आहेत.

सप्टेबर महिन्यात गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाल्याने अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ९५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, पैठणमधील जायकवाडीत फक्त ४७ टक्के पाणीसाठा आहे.

मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या समन्यायी पाणी वाटपाबाबत 17 ऑक्टोबरला बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत पाण्याचा हिशेब झाल्यानंतर ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांतून जायकवाडी प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया देखील तातडीने करावी, अशी मागणी मराठवाड्यातील आमदारांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीनंतर गोदावरी नदीपात्रातील धरणातून जायकवाडीत पाणी सोडले जाणार का? याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Prices: 'रब्बी'तही खतांची चिंता! युरिया, 'डीएपी' १० ते १५ टक्क्यांनी महागणार; कारण काय?

Mid Day Meal: चार महिन्यांपासून इंधन, भाजीपाल्याचे अनुदान थकित

NABARD Insurance: शेतपिकांसह आता दूध उत्पादन, मत्स्यपालन क्षेत्रालाही विमा संरक्षण, काय आहे 'नाबार्ड'ची नवीन योजना

PM Kisan 21st Installment: पीएम किसानचा २१ वा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट, 'या' शेतकऱ्यांना २ हजार मिळणार नाहीत

Panchayatraj Abhiyaan: महाश्रमदान मोहिमेत राबले हजारो हात!

SCROLL FOR NEXT