Farmer with Digital ID Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer ID : द्राक्ष व्यापाऱ्यांना ओळखपत्र देण्याची मागणी

Team Agrowon

Sangli News : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी संबंधित द्राक्ष व्यापाऱ्यांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडे केली.

या बाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गेल्या तीन वर्षांच्या हंगामांमध्ये व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यासाठी व येत्या द्राक्ष हंगामामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये

याकरिता द्राक्ष माल खरेदीसाठी येणाऱ्या व्यापारी यांची सर्व माहिती कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत गोळा करून त्याची एनओसी तयार करून पोलिस स्टेशनला पाठवावी व पोलिस विभागाकडून संबंधित व्यापाऱ्यास परवाना देण्यात यावा. कार्यक्रमावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजय शिंदे, संघाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

गेल्या तीन वर्षांत ज्या द्राक्ष उत्पादकांची फसवणूक झाली आहे त्यांनी व्यापाऱ्यांचे नाव, रक्कम या बाबतची माहिती पुराव्यासह द्राक्ष बागायतदार संघाकडे द्यावी. पोलिस प्रशासनाच्या मदतीने ही भरपाई रक्कम वसुलीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे माहिती जमा करावी, असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाने केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing Season : सांगली जिल्ह्यात पावसामुळे गाळप हंगाम लांबण्याची शक्यता

Crop Damage Compensation : खानदेशात ‘केवायसी’अभावी अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित

Watermelon Cultivation : खानदेशात कलिंगड लागवड रखडली

Vidhan Sabha Election Buldhana : बुलडाणा जिल्ह्यात २१.२४ लाख मतदार

Vidhan Sabha Election Beed : बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघात २१ लाखांवर मतदार

SCROLL FOR NEXT