Demand for Fellowship Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Research : कृषी संशोधनासाठी ‘फेलोशिप’ची मागणी

Demand for Fellowship : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन करीत असलेल्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळावी, अशी मागणी कृषिमंत्री धनजंय मुंडे व विद्यापीठांच्या कुलगुरूंकडे करण्यात आली आहे.

Team Agrowon

Akola News : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन करीत असलेल्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळावी, अशी मागणी कृषिमंत्री धनजंय मुंडे व विद्यापीठांच्या कुलगुरूंकडे करण्यात आली आहे.

याबाबत संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांनी म्हटलेय, की राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे मोठ्या संख्येने विद्यार्थी संशोधन करीत आहेत.

राज्यात सारथी, महाज्योती, बार्टीअंतर्गत मिळणाऱ्या ‘फेलोशिप’ची कमी मदत विद्यार्थ्यांना केली आहे. कृषी क्षेत्रात महत्त्वाच्या संशोधनासाठी काम करीत असलेले विद्यार्थी फेलोशिप मागत आहेत. कीटक, वनस्पतींवरील रोग, सुधारित वाण, नवनवीन खते, पिकांवरील जैविक व अजैविक ताण, जलसंवर्धन, पशुपालन अशा अनेक कृषी क्षेत्रातील समस्यांवर संशोधन करून त्याचे उपाय शोधण्याचे काम हे विद्यार्थी करीत असतात.

कृषी क्षेत्रात संशोधनासाठी लागणारा खर्च हा खूप जास्त आहे. त्यासाठी आर्थिक साह्य मिळणे आवश्यक आहे. हजारो कृषी पदवीधर विद्यार्थ्यांमधून स्पर्धा परीक्षा देऊन हे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पात्र ठरतात. देशाच्या अन्नसुरक्षेसाठी कृषी संशोधनावर भर व शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत आवश्यक आहे, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loan Waiver Issue: नांदेडमध्ये किसान सभेकडून कर्जमाफी आदेशाची होळी

Record Inspection: मिथेनॉल, गूळ व्यापाऱ्यांच्या नोंदवह्यांची तपासणी

Fodder Management: कमी पावसाच्या दृष्टीने चारा नियोजन कसे कराल?

Crop Loan Issues: परभणी जिल्ह्यात १,४७७ कोटी रुपयांचे बुडीत पीककर्ज

Banana Orchard Damage: नांदोरे, पेहेमध्ये केळी बागांचे नुकसान

SCROLL FOR NEXT