Naam Foundation : नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे पाणीग्रस्त गावांना आवाहन; म्हणाले, "पाण्यासाठी काम..."

Nana Patekar and Makarand Anaspure : राज्यातील ज्या गावांत पाण्याची समस्या आहे, या गावांनी नाम फाउंडेशनशी संपर्क करा, असे आवाहन सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांनी मुंबईत मंत्रालयाबाहेर केले आहे. यावेळी जेष्ठ सिनेअभिनेते नाना पाटेकरही उपस्थित होते.
Naam Foundation
Naam FoundationAgrowon

Pune News : गेल्या वर्षी पावसाने मारलेल्या दडीमुळे यंदा राज्यात दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. यामुळे विविध जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावरून सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी राज्यातील ग्रामीण जनता आणि गावांना आवाहन केले आहे. राज्यातील ज्या गावांना पाण्याचा प्रश्न आहे, त्यांनी नाम फाउंडेशनशी संपर्क करा, असे आवाहन केले आहे. हे आवहान त्यांनी सोमवारी (ता. ११) मंत्रालयाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना केले आहे.

तसेच यावेळी अभिनेते अनासपुरे यांनी राज्यातील नद्या, तलाव आणि नाल्यातील गाळ काढण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि नाम फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाल्याची माहिती दिली.

Naam Foundation
Water Problem In Parbhani : परभणी जिल्ह्यातील चारठाणा, जोगवाडा, बेलखेडा लघु तलाव कोरडे

यावेळी अभिनेते अनासपुरे म्हणाले, गेल्या वर्षी आमच्या नाम फाउंडेशनकडून राज्यातील १० जिल्ह्यात काम करण्यात आले होते. यात आमचे टार्गेट पूर्ण झालेले नाही. मात्र यंदा शासनाबरोबर झालेल्या सामंजस्य करारमुळे हे टार्गेट पूर्ण होणार आहे. यंदा राज्यातील ३५० गावं आणि ५० लाख क्यूबिक पेक्षा जास्त गाळ हा शासनाच्या मदतीने काढण्याचा आमचा मानस आहे. तसेच कोयना धरणातील गाळ काढण्याचे कामही सुरू करण्यात आल्याची माहिती देताना, गाळ काढण्याच्या कामामुळे राज्यातील पाण्याचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असेही अनासपुरे यांनी म्हटले आहे.

अनासपुरे म्हणाले, नाम फाउंडेशनकडून राज्यातील ही चळवळ लोकांनी लोकांसाठी चालवलेली आहे. तिला आज राज्य मान्यता मिळाली आहे, असेही अनासपुरे म्हणाले. निसर्ग चक्र हे आपल्या हातात नसून एलनिनोचे चक्र मार्चपर्यंत बदलू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. तर राज्यातील दुष्काळ हटविण्यासाठी शासन आपले काम करेलच. पण एक धर्मादाय संस्था म्हणून आमच्या अखत्यारीत जे काही आहे ते सगळं आम्ही करू, असेही अनासपुरे यांनी म्हटले आहे.

Naam Foundation
Hair problem : केस पांढरे होतायतं, टक्कल पडतयं तर मग करा हा उपाय

यावेळी नाना पाटेकर यांनी, निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का या प्रश्नावर, मला फक्त कळवा मला कोठून निवडणूक लढवायची आहे, असे म्हटले आहे. तर राजकारण आपला पिंड नसून या कामात समाधान आहे. हे मला समाधान राजकारणात नाही मिळणार. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे गाळ काढण्यासह पाण्यासाठी सुरू असणारी चळवळ आज राज्यासह देशभर सुरू झाली आहे. आता राज्य शासनाबरोबर सामंजस्य करार झाला आहे, असेही नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.

नाना पाटेकर पुढे म्हणाले, हे काम आता काश्मिर, राजस्थान, उत्तर प्रदेश, गोवाहाटीसह बुंदेलखंडमध्ये सुरू केलं आहे. तर ज्या कंपन्या नाम फाउंडेशनला सीएसआरमधून फंड देत आहेत, तेच स्थळ ही सुचवत आहेत. यामुळे हे काम आता राज्याबाहेर जात आहे. पण पहिले प्राधान्य हे महाराष्ट्रालाच असेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com