Kharif Season agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : हिंगोलीत खरिपाच्या ७२ हजार क्विंटल बियाण्याची मागणी

हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात ३ लाख ४६ हजार ६१ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे.

Team Agrowon

Hingoli Agriculture News : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या (२०२३) खरीप हंगामात (Kharid Season) ३ लाख ४६ हजार ६१ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. त्यासाठी आवश्यक विविध पिकांच्या ७२ हजार ६९२ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी नीलेश कानवडे यांनी दिली.

हिंगोली जिल्ह्यातील खरिपातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे यंदाचे प्रस्तावित पेरणीक्षेत्र गतवर्षीएवढेच म्हणजे २ लाख ५७ हजार ४२९ हेक्टर गृहित धरण्यात आले आहे. प्रस्तावित क्षेत्रातास १ लाख ९३ हजार ३०७ क्विंटल बियाण्याची गरज असेल.

प्रस्तावित बियाणे बदलाचे प्रमाण ३५ टक्केनुसार ६७ हजार ५७५ क्विंटल बियाण्याची गरज असेल. खरीप हंगाम २०२२ मधील ग्रामबीजोत्पादन मोहिमेद्वारे आणि शेतकऱ्यांकडील राखीव मिळून एकूण २ लाख ५१ हजार ७५० क्विंटल बियाणे आहे.

त्याव्यतिरिक्त ६७ हजार ५७५ क्विंटल बियाण्याची मागणी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादक कंपन्याकडे करण्यात आली आहे. त्यात महाबीजकडे ५ हजार २१ क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडलाकडे १ हजार २०० क्विंटल आणि खासगी कंपन्यांकडे ६१ हजार ३५४ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.

कपाशी, तूर, मूग, उडीद, ज्वारी, मका, तीळ, सूर्यफूल आदी पिकांचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र ८८ हजार ६३२ हेक्टर आहे. त्यात ज्वारीच्या ४ हजार १६७ हेक्टर, मुगाचे ६ हजार ७५८ हेक्टर, उडदाचे ५ हजार ८४२ हेक्टर, तुरीचे ३८ हजार ४१८ हेक्टर, सूर्यफुलाचे १०० हेक्टराचा समावेश आहे.

विविध पिकांचे मिळून सार्वजनिक कंपन्यांकडे ४४४ क्विंटल आणि खासगी कंपन्यांकडे ४ हजार ६७३ क्विंटल असे एकूण ५ हजार ११७ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे.

त्यात ज्वारीचे ३१२ क्विंटल, मूग ४०५ क्विंटल, उडीद ३५० क्विंटल, तूर ३ हजार १६९ क्विंटल, मक्याचे २३.८१ क्विंटल, बियाण्याची मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Samruddhi Yojana: कृषी समृद्धी योजनेसाठी निधीचा ठणठणाट

Maharashtra Rain Alert: राज्यात विजांसह पावसाची शक्यता

Crop Insurance Compensation: पीकविम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार; २०२२ ते रब्बी २०२४-२५ ची भरपाई मिळणार

Agrowon Podcast: कापूस दर दबावातच; उडद- ढोबळी मिरचीचे भाव स्थिर, काकडीचे दर नरमले, तर पेरुचा आवक स्थिर

Ragi Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात, नाचणी रोप लागवड पूर्ण

SCROLL FOR NEXT