Kharif Season : खरिपासाठी सर्व प्रकारच्या ३९ हजार १०३ क्विंटल बियाण्यांची गरज

कृषी विभागाच्या माहितीनुसार, की गत तीन वर्षाच्या पीक पेरणी सरासरीनुसार जिल्ह्यात ६ लाख ५६ हजार ९५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या क्षेत्राकरिता संकरित ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, तूर, मका, सूर्यफूल, तीळ, संकरित कापूस (Cotton) आदी पिकांच्या ३९ हजार १०३ क्विंटल बियाण्याची गरज असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने (Agriculture Department) देण्यात आली.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, की गत तीन वर्षाच्या पीक पेरणी सरासरीनुसार जिल्ह्यात ६ लाख ५६ हजार ९५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणे दरानुसार व बियाणे बदल दरानुसार सर्वच शेती पिकाच्या ३९ हजार १०३ क्विंटल बियाण्याचे आवश्यकता आहे.

त्यामध्ये संकरित ज्वारी ४३ क्विंटल, संकरित बाजरी ७८४ क्विंटल, तूर २१९२ क्विंटल, मूग ४२४ क्विंटल, उडीद २३२ क्विंटल, मका २६०७३ क्विंटल, भुईमूग २०१, सूर्यफूल ५ क्विंटल, तीळ दोन क्विंटल, तर संकरित कापसाचे ९०७७ क्विंटल बियाणे लागणार आहे.

Kharif Season
Kharif Sowing Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६ लाख ७७ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी

त्यापैकी १४९५ क्विंटल महाराज बीज कडून ३५६ क्विंटल राबिनी कडून तर ३७ हजार २५२ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ९४ हजार २६८ हेक्टर आहे.

गत खरीप हंगामात ३ लाख २५२८ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. यंदा ३ लाख ८२ हजार १७७ हेक्टर क्षेत्र कपाशीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी १९ लाख १० हजार ९४७ बीटी कापूस बियाणे पाकिटांची गरज असेल असेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.

दुसरीकडे सोयाबीनच सरासरी क्षेत्र १३२१४ हेक्टर आहे. यासाठी बियाण्यांची सरासरी विक्री ५,०४१ क्विंटल आहे. येत्या खरीप हंगामासाठी ३२,१९३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी २४१४५ क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज भासेल.

त्यामधून ८०० क्विंटल महाबीज, ४०० क्विंटल राबिनी, ११७४५ क्विंटल खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून तर ११२०० क्विंटल सोयाबीन बियाणे शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या बियाण्यासह उन्हाळी सोयाबीन बियाण्यातून उपलब्ध होणे अपेक्षित असल्याचेही कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com