Kharif and Rabi seasons Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : रब्बी हंगामासाठी ४५ हजारांवर क्विंटल बियाण्यांची मागणी

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात कृषी विभागाने रब्बी हंगाम २०२४-२५ करिता शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन केले जात आहे. यंदा जिल्ह्यासाठी ४५ हजार १८० क्विंटल विविध रब्बी बियाण्याची मागणी महाबीज व खासगी कंपन्यांकडे करण्यात आली आहे.

विविध ग्रेडची ४५ हजार ४९५ टन खते, नॅनो युरियाच्या ४२ हजारांवर तर नॅनो डिएपीच्या २५ हजारांवर बॉटल उपलब्ध होणार, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये २ लाख १२ हजार १५० हेक्टरवर विविध पिकांची पेरणी तसेच ५० हेक्टरवर कांदा लागवड झाली होती.जिल्ह्यात २०२१ ते २०२३ या तीन वर्षीच्या रब्बी हंगामात सरासरी ५६ हजार ४९८ क्विंटल बियाण्याची विक्री झाली.

यंदा २ लाख १३ हजार ३७७ हेक्टर पेरणी प्रस्तावित आहे. त्यात ज्वारी १६ हजार ९०० हेक्टर, गहू ३६ हजार हेक्टर, मका ४७९ हेक्टर, हरभरा १ लाख ५६ हजार ७५० हेक्टर, करडई २ हजार २३० हेक्टर, सूर्यफूल ३९१ हेक्टर, जवस ४ हेक्टर या प्रमुख पिकांसह कांदा ८५ हेक्टर लागवड प्रस्तावित आहे.

प्रस्तावित क्षेत्रानुसार महाबीजकडे ९ हजार २४० क्विंटल व खासगी कंपन्यांकडे ३५ हजार ९४० क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यात ज्वारीचे ४४६ क्विंटल, गव्हाचे १३ हजार ३३७ क्विंटल, मक्याचे ७१ क्विंटल, हरभऱ्याचे ३१ हजार ३६ क्विंटल, करडईच्या १०० क्विंटल,सूर्यफुलाच्या ३९ क्विंटल, इतर पिकांचे १४९ क्विंटल तसेच कांदा बियाण्याची ४.२८ क्विंटल मागणी करण्यात आली आहे.

४५ हजार टन खते....

यंदाच्या रब्बी हंगामासाठी युरिया १२ हजार २६० टन, सिंगर सुपर फॉस्फेट ७ हजार ४७६ टन, पोटॅश १ हजार ५०९ टन, डीएपी ५ हजार ७३७ टन, एनपीके (संयुक्त खते) १८ हजार ५१५ टन मिळून एकूण ४५ हजार ४९५ टन खतसाठा मंजूर आहे. यंदा नॅनो युरियाच्या ४२ हजार ५४१ आणि नॅनो डिएपीच्या २५ हजार २४० बॉटल उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

UPSC Success Story : देवडीच्या अश्पाक मुलाणीचे ‘युपीएससी’मध्ये यश

Water Pollution : पुणे परिसरातील प्रदूषित पाणी थेट उजनी धरणात

Ujani Dam : दीड महिन्यात उजनीतून सोडले १०० टीएमसी पाणी

Kandalwan : अतिसंवेदनशील कांदळवनांवर सीसीटीव्हीचा वॉच

Rain Fear : पावसाची शेतकऱ्यांना धास्ती

SCROLL FOR NEXT