Authentic Seeds : पंदेकृवीत रब्बीसाठी हरभरा, गहू, ज्वारीचे सत्यप्रत बियाणे उपलब्ध

PDKV Akola : मागील काही वर्षांत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन कार्यक्रम विस्तारत असून यंदाच्या रब्बी हंगामासाठी हरभरा, ज्वारी, गव्हाचे सत्यप्रत बियाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
Soybean Sowing
Soybean SowingAgrowon
Published on
Updated on

Akola News : मागील काही वर्षांत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन कार्यक्रम विस्तारत असून यंदाच्या रब्बी हंगामासाठी हरभरा, ज्वारी, गव्हाचे सत्यप्रत बियाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी हे खात्रिशीर बियाणे खरेदी करण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

विद्यापीठाने विकसित केलेल्या हरभरा जाकी-९२१८ या वाणाचे एकूण २८० क्विंटल सत्यप्रत बियाणे आहे. यात वणीरंभापूर मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर २०० क्विंटल, मध्यवर्ती संशोधन केंद्रात ५० क्विंटल आणि अमरावती विभागीय संशोधन केंद्रावर ३० क्विंटल बियाणे आहे. अवघे ८० रुपये किलो दराने हे बियाणे मिळणार आहे.

Soybean Sowing
Onion Seed Rate : कांदा बियाणे उगवणीसह दरांबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी

हरभऱ्याचा पीडीकेव्ही कांचन वाणाचे ४०७ क्विंटल सत्यप्रत बियाणे बियाणे यंदा आहे. विद्यापीठाच्या उपरोक्त केंद्रावर ७२ रुपये दराने विक्री केली जात आहे. तसेच नवीन हरभरा पीडीकेव्ही कनक वाणाचे ३५ क्विंटल सत्यप्रत बियाणे आहे. हे बियाणे ८० रुपये दराने उपलब्ध करून देण्यात आले आहे.

रब्बी गव्हाचा पीडीकेव्ही सरदार (एकेएडब्ल्यू-४२१०-६) या वाणाचे एकूण ३९ क्विंटल सत्यप्रत बियाणे आहे. ३५ रुपये प्रतीकिलो दराने उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. एकेएडब्ल्यू-४६२७ या गव्हाच्या वाणाचे ३० क्विंटल सत्यप्रत बियाणे वणी रंभापूर मध्यवर्ती प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर आहे. गव्हाचा कमी पाण्यावर येणारा वाण पीडीकेव्ही वाशीम पाच क्विंटल बियाणे आहे.

Soybean Sowing
Seed Germination Test : पेरणीपूर्वी करा बियाणे उगवणक्षमता तपासणी

रब्बी ज्वारीच्या पीकेव्ही क्रांती या वाणाचे एकूण ४५ क्विंटल सत्यप्रत बियाणे असून ७० रुपये प्रतीकिलो दराने मिळणार आहे. त्याचप्रमाणे करडईचा नवीन वाण पीकेव्ही पिंक या वाणाचे ८० रुपये दराने बियाणे उपलब्ध आहे. जवसाच्या एन एल-२६० या वाणाचे एकूण ४८ क्विंटल सत्यप्रत बियाणे लागवडीसाठी असून १२० रुपये प्रतिकिलो दराने विक्री सुरू आहे.

मोहरी या पिकाचा नवीन वाण टीएएम-१०८-१ प्रसारित करण्यात आले असून या वाणाचे एकूण २१.५० क्विंटल सत्यप्रत बियाणे १२५ रुपये प्रतिकिलो दराने विद्यापीठाच्या अमरावती विभागीय संशोधन केंद्र, अकोला मध्यवर्ती संशोधन केंद्र, गहू संशोधन केंद्र व अचलपूर कृषी संशोधन केंद्रावर उपलब्ध आहे. कांदा पिकाचे विद्यापीठाने प्रसारित केलेले प्रचलित वाण अकोला सफेद या वाणाचे एकूण ६ क्विंटल बियाणे कृषी संशोधन केंद्र, अकोला भाजीपाला संशोधन केंद्र आणि भाजीपाला विभाग प्रमुखांकडे आहे. १५०० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com