Delhi/Pune Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Delhi/Pune Rain Update : दिल्लीसह महाराष्ट्राला  अवकाळीने झोडपले; दिल्लीत दोघांचा मृत्यू, पुण्यात रस्त्यावर पाणी

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात अवकाळीने जोरदार हजेरी लावली असून आता उत्तर भारतात देखील पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाच्या दिल्ली विभागाने दिलेल्या शक्यतेनुसार शुक्रवारी अवकाळी पावसाने दिल्ली एनसीआरला झोडपले. यामुळे दिल्लीतील उष्णता वाढण्याची शक्यता असून १३ मेपर्यंत कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच शनिवारी विजांच्या गडगडाटासह जोरदार राऊस होण्याची शक्यता दिल्लीमध्ये वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये १५ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यादरम्यान राज्यातील विदर्भासह पुणे, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरमध्ये पाऊस झाला. 

दिल्ली हवामान खात्यानुसार, दिल्लीतील नवीन सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे शनिवार आणि रविवार जोरदार पाऊसासह कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. यादरम्यान शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे दिल्लीत अनेक झाडे कोडमडून पडल्याने दोघांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी आहे. सध्या दिल्लीत पावसाच्या इशाऱ्यानंतर दिल्लीकरांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आळे आहे. दिल्लीत शुक्रवारी रात्री सोसायट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस झाला. यात इमारतींचे नुकसान झाले. तसेच इमारतींच्या पडझडीत १७ जण जखमी झाले असून ६ जण झाडे पडून झाले आहेत.  

दरम्यान राज्यातील विदर्भासह पुणे, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर अवकाळीने झोडपल्याने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे आधीच चिंतेत असणारा शेतकरी आणखीन चिंतेत आला आहे. यावेळी हवामान खात्याने मुंबईसाठी १५ मेपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, घाट आणि दक्षिण कोकणात जोरदार वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पावसासाठी वातावरण तयार झाले असून मुंबईच्या किनारपट्टी भागामध्ये पाऊस पडू शकतो असेही हवामान विभागाने सांगितले आहे. 

याबाबत हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी एक पोस्ट शेअर केली असून यात त्यांनी, 'मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा होईल असे सांगितले आहे. त्यांनी सांगितलेल्या अंदाजानुसार येथे वाऱ्यांचा वेग ४०-५० किमी प्रति तास असू शकतो. 

पुण्यात रस्त्यांवर पाणी 

शुक्रवारी रात्री झालेल्या अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. पुणे शहर आणि उपनगरात  सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले. तसेच जुन्नर आंबेगाव तालुक्यातील विविध गावात आवकाळी पावसाने हजेरी लावल्याने उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र उन्हाळी बाजरीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. 

छत्रपती संभाजीनगर 

छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळीने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावल्याने काही प्रमाणात उष्णतेच्या झळा आणि वाढत्या तापमानात गारवा निर्माण झाला आहे. तसेच पाणीटंचाईमुळे निर्माण झालेल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्नावर देखील दिलासा मिळाला आहे. येथील कन्नड, चित्तेपिंपळगाव, काद्राबाद वेरूळ, खुलताबाद, आणि फुलंब्री परिसरात चांगला पाऊस झाला. मात्र फुलंब्री तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथील घरावर झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला

अहमदनगरला इशारा 

अहमदनगर जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू असून पुढील ३ दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने नाशिककरांची तारंबळ उडाली असून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र सिन्नर अभरण्यासह अन्य काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सांगलीत आंबा, भाजीपाला पिकाचे नुकसान

सांगली जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळीने वाळवा तालुक्यातील कुरळप परिसराला भिजवले. येथे आंबा, भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातही दमदार हजेरी

अवकाळी पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातही दमदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्री पावसाने कागल, भूदरगड, कोल्हापूर शहर आणि उपनगर, चंदगडमधील कोवाडला पाऊस झाला. टोप परिसरात सोसाट्याच्या वाऱ्याने काही घरांचे छपराचे पत्रे उडवले, काही ठिकाणी झाडे पडली. तसेच क.सांगावमध्ये देखील विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा पाऊस झाल्याने झाडे उन्मळून पडली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT