Washim Rain Update : वाशिमला अवकाळी पावसाचा तडाखा; शंभर एकरावरील बीजवाई कांदा भुईसपाट

Vidarbha Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजाप्रमाणे गेल्या दोन दिवसापासून विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. याआधी नागपूरला शनिवारी (ता.१६) विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊसाने झोडपले होते. तर रविवारी (ता.१७) अवकाळी पावसाने वाशिमला तडाखा दिला आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Pune News : हवामान विभागाने दर्शवलेल्या अंदाजाप्रमाणे गेल्या दोन दिवसापासून विदर्भात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. रविवारी (ता.१७) वाशिम जिल्ह्यात दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाल्याने कोठे हलका तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्याला जोरदार पावसाने झोडपले. यामुळे येथील शंभर एकरावरील बीजवाई कांदा (बियाणे) भुईसपाट झाला. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. 

हवामान विभागाने विदर्भाला वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली होती. याप्रमाणे रविवारी (ता.१७) दुपारी अवकाळी पावसाने वाशिममध्ये अचानक हजेरी लावली. जिल्ह्यातील बहुतांश भागात कुठे हलका, कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन भागासह तराळा, शेलू बाजार भागात कांदा, बीजवाई कांदा व इतर पिकांना जोरदार पावसाचा तडाखा बसला. येथे दुबार लागवड केलेला बीजवाई कांदा अवकाळी पावसामुळे भूईसपाट झाला आहे. यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

Rain Update
Nagpur Rain Update : नागपुरला पाऊस अन् गारपीटने झोडपले; हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट घोषित 

याआधी पावसासह गारपीट 

याआधी जिल्ह्यातील कारंजा व मंगरूळपीर तालुक्यात फेब्रुवारीमध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. यामुळे तालुक्यातील वनोजा, शिवनी शेलुबाजारासह अनेक ठिकाणी गहू, हरभरा, संत्रा फळबागेचे नुकसान झाले होते. 

Rain Update
Rain Update : राज्यात पावसाची शक्यता; कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?

आर्थिक मदतीची मागणी

यंदा अवकाळी पावसामुळे आधी फेब्रुवारीमध्ये गहू, हरभरा, संत्रा फळबागेचे नुकसान झाले होते. तेव्हा नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. संकटातून येथील शेतकरी बाहेर पडत नाहीत, तोच पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे लागवड केलेला बीजवाई कांद्याची लागवड करावी लागणार आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. 

दरम्यान १८ आणि १९ मार्च रोजी नागपूरला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तसेच वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली होती. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून गरज नसताना घराबाहेर पडून नका, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com