Jalgaon ZP  Agrowon
ॲग्रो विशेष

Jalgaon ZP : जळगाव जिल्हा परिषदेत रखडलेल्या फायलींनी नागरिकांची कोंडी

ZP Administration : जिल्हा परिषदेत कोरोनानंतरही फायली रखडणे, कामे संथ गतीने करणे, निकडीचे विषय मार्गी न लावणे असे प्रकार सुरूच आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्हा परिषदेत कोरोनानंतरही फायली रखडणे, कामे संथ गतीने करणे, निकडीचे विषय मार्गी न लावणे असे प्रकार सुरूच आहेत. प्रशासकराज लवकर दूर करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

विविध पदे रिक्त होती. त्या वेळेसही अशीच स्थिती होती. आता अधिकारी नियुक्त करूनही अशीच स्थिती आहे. जिल्हा परिषदेत कोरोनानंतर प्रशासकराज आले. पंचवार्षिकची मुदत संपल्याने पदाधिकारी, सदस्यांचे अधिकार संपुष्टात आले. कार्यकाळ संपला, पण निवडणूक झालेली नाही. काही वरिष्ठ अधिकारीदेखील लक्ष देत नसल्याने फायली रखडल्या आहेत.

जिल्हा परिषदेत प्रशासकराज आहे, अशी टीका ग्रामस्थ, सरपंच मंडळी करीत आहेत. यात काही विभागप्रमुख, प्रभारी अधिकाऱ्यांवर कामाचा ताण आहे. यात सर्वच विभागांवर लक्ष देणे शक्य नसल्याने फायलींवर १२ दिवसांत काम होत नाही.

सेवा हमी कायद्याचे उल्लंघन जिल्हा परिषदेत होत आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाहणी दौरेही कुठे आटोपतात, ते समोर येत नाही. निरीक्षण, तपासणीचे कार्यक्रम कसे राबविले जातात, हेदेखील आता कोडे बनले आहे.

वित्त विभागात फायली रखडल्याने निधीबाबत अंतिम कार्यवाही तसेच बांधकाम, पाणीपुरवठा या विभागासंबंधी नवे प्रस्ताव, मंजुऱ्यादेखील रखडल्या आहेत. काही अधिकाऱ्यांकडून पालकमंत्री व अन्य नेत्यांना माहिती दिली जाते.

परंतु सामान्य ग्रामस्थ, माजी सदस्य, सरपंच मंडळींना जिल्हा परिषदेत हेलपाटे मारावे लागतात. वित्त विभागात बिले काढण्याबाबत चालढकल केली जाते. केवळ निधीअभावी बांधकाम विभागाची कामे रखडली आहेत. निधी आहे, पण तो खर्च केला जात नाही, अशाही तक्रारी केल्या जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : मराठवाडा, विदर्भात पावसाचा अंदाज; राज्यात शनिवार, रविवार पावसाचा जोर कमी राहणार

Farmers Market : शेतकरी बाजाराचा मुद्दा मागे पडला

Banana Procurement : कमी दरात केळीच्या खरेदीचा धडाका

Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्दचा शेतकरी आणि नागरिकांना काय फायदा मिळणार ?

Cotton Farming : कापूस उत्पादन वाढीसाठी मूलभूत टिप्स

SCROLL FOR NEXT