Ujani Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Ujani Dam Water Level : उजनीतील पाणीसाठ्यात घट

Ujani Dam Water Capacity : पुणे जिल्ह्याकडील धरणांतील अतिरिक्त पाणी उजनी धरणाकडे सोडण्यात येत होते. पण तिकडील धरणांतील विसर्ग सध्या थांबवण्यात आल्याने धरणाची ६१ टक्क्यांवर पोचलेली पाणीपातळी हळूहळू घटू लागली आहे. शुक्रवारी (ता. २०) धरणाची पाणीपातळी ५८.९८ टक्क्यांवर खाली आली.

Team Agrowon

Solapur News : पुणे जिल्ह्याकडील धरणांतील अतिरिक्त पाणी उजनी धरणाकडे सोडण्यात येत होते. पण तिकडील धरणांतील विसर्ग सध्या थांबवण्यात आल्याने धरणाची ६१ टक्क्यांवर पोचलेली पाणीपातळी हळूहळू घटू लागली आहे. शुक्रवारी (ता. २०) धरणाची पाणीपातळी ५८.९८ टक्क्यांवर खाली आली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यंदा पावसाने प्रदीर्घ ओढ दिल्याने सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढली, पण पंधरवड्यापूर्वी पुणे जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. परिणामी तिकडील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला. त्यानंतर तेथील अतिरिक्त पाणी सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाकडे सोडण्यात येत होते.

सुरुवातीला तब्बल ४० हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला. त्या बळावरच उणेत गेलेले धरण अत्यंत वेगाने अधिकमध्ये आलेच, पण पाणी पातळीही तब्बल ६१ टक्क्यांच्या घरात पोचली. पण पुण्याकडील धरणातून येणारा विसर्ग सध्या पूर्णपणे थांबवण्यात आला आहे.

त्यामळे वाढलेली पाणीपातळी पुन्हा किंचित घटू लागली आहे. शुक्रवारी पातळी ४९४.९०० मीटरपर्यंत राहिली. तर एकूण साठा ९६.१५ टीएमसी आणि त्यातील उपयुक्त साठा ३२.५० टीएमसी एवढा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी ५८.९८ टक्के एवढी राहिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT