Satara News : आले खरेदी-विक्री अजूनही नवा जुना प्रतवारीनुसार सुरू असतानाच मागील आठवड्यापासून आले पिकाच्या दरात घट झाली आहे. सध्या नवे-जुने एकत्रित आले पिकास प्रतिगाडी (५०० किलो) २५ ते २८ हजार रुपये दर मिळत आहे. दरामध्ये गाडीमागे पाच ते आठ हजार रुपये घट झाली आहे.
जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने आले काढणीवर परिणाम झाला आहे. आल्यात पाणी साचत असल्याने मूळकुज, कंदकुज होण्याची भीती शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे आले प्रतवारी न करता एकत्रित खरेदी करावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. पथके स्थापन करून जागोजागी आले जप्त केले जात आहे. याचा आले पिकांच्या दरावरही परिणाम दिसू लागला आहे. सध्या आले पिकाच्या दरातही घसरण झाली आहे. प्रतवारी न केलेल्या (नवे-जुने) आल्यास प्रतिगाडीस २५ ते २८ हजार रुपये दर मिळत आहे.
प्रतवारी केलेल्या आल्यास प्रतिगाडीस ३७ ते ४० हजार रुपये तसेच नवीन आल्यास प्रतिगाडी पाच ते सात हजार रुपये दर मिळत आहे. मागील महिन्याच्या तुलनेत एकत्रित आल्याच्या दरात पाच ते आठ हजार रुपये घट झाली आहे. पावसामुळे आले पीक काढण्यास अडचणी येत आहेत. तसेच आल्यास कंदकुज व मूळकुजचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. यामुळे आले पीक काढणीस प्राधान्य दिले जात आहे.
नवे-जुने केल्यामुळे व्यापाऱ्यांकडून आले खरेदी प्रतिसाद कमी झाला आहे. एकत्रित आले पिकांचा दरात घसरण झाल्याने आले विकावे की ठेवावे, असा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कंदकुज व मूळकुजचा प्रादुर्भाव वाढल्यास नवीन केलेले आलेही काढण्यास आल्याची आवक वाढणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.