Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : कांदा पिकाचे उत्पादन घटल्याने शेतकरी निराश

Onion Cultivation : दर वर्षी या भागात एकरी दीडशे क्विंटलपर्यंत येणारे कांदा उत्पादन यावर्षी बरेच शेतकऱ्यांना एकरी ६० ते ७० क्विंटलपर्यंत आले आहे.

Team Agrowon

Buldana News : तालुक्यातील कांदा पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने कांद्याची हिरवीगार पाल सुकत आहे. संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, सोगोडा, दानापूर शिवारांत शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा पिकाची पेरणी डिसेंबर अखेर केली.

यंत्राच्या साह्याने पेरणी केली होती. त्यानंतर उगवलेले कांदा पीक तणविरहित ठेवले. मागील पंधरा दिवसाआधीपासून कांदा पिकावर अज्ञात रोगाने आक्रमण केल्याने पीक अचानक सुकायला लागले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा उपटून व्यापाऱ्यांना विकणे सुरू केला आहे.

दर वर्षी या भागात एकरी दीडशे क्विंटलपर्यंत येणारे कांदा उत्पादन यावर्षी बरेच शेतकऱ्यांना एकरी ६० ते ७० क्विंटलपर्यंत आले आहे. अज्ञात रोगामुळे हे उत्पादन घटले.

शेतकऱ्याच्या कांदा १७०० ते १८०० रुपये किंटल दराने व्यापारी खरेदी करीत आहेत. या पिकासाठी पीकविमा निघत नसल्याने शेतकरी हतबल आहेत.

दोन एकर कांदा पीक चांगल्या अवस्थेत होते. मात्र अचानक अज्ञात रोगाने कांदा पिकावर आक्रमण केल्याने कांदा पीक परिपक्व कालावधी पूर्ण होण्याआधीच उपटावे लागत आहे. उत्पादनात घट दिसून येत आहे.
- दीपक बारब्दे, शेतकरी, बोरखेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Procurement: ‘सीसीआय’ वाढविणार कापूस खरेदीची मर्यादा

Pawata Crop: भोर, हवेली, मुळशीत गावरान पावट्याचा हंगाम बहरला

Leopard Alert: रांजणगावच्या औद्योगिक क्षेत्रात धडकला बिबट्या

Bamboo Policy: ‘बांबू धोरण २०२५’ राबविण्याचे आदेश

Mahavistar App: कोणत्या हंगामात काय पेरायचं, कधी विकायचं?

SCROLL FOR NEXT