Onion Cultivation: अहिल्यानगरमध्ये कांदा लागवडीचा उच्चांक; ५५ हजार हेक्टरने क्षेत्रवाढ!

Onion Farming Growth: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा कांदा लागवड क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५५ हजार हेक्टरने अधिक क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. खरीप, लेट खरीप आणि रब्बी हंगाम मिळून २.५६ लाख हेक्टरवर कांद्याचे उत्पादन घेतले जात आहे.
Onion Cultivation
Onion CultivationAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा कांदा लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास लाख हेक्टर क्षेत्राने वाढ झाली आहे. यंदा खरीप, लेट खरीप, रब्बीत मिळून २ लाख ५६ हजार १८५ हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्या वर्षी २ लाख १ हजार ८३७ हेक्टरवर लागवड झाली होती. या वर्षी पाणी उशिरापर्यंत पुरेल असा अंदाज असताना पाणीपातळी खालावल्याने मात्र मोठी अडचण निर्माण झाली आहे.

उसाचा आणि साखर कारखान्याचा जिल्हा अशी ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांपासून कांदा, कापूस व अन्य पिकांचे क्षेत्र वाढत आहे. अलीकडच्या चार-पाच वर्षांत कांद्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मागील दोन वर्षांत पुरेसा दर मिळाला नाही. यंदाही फारसा दर नाही असे असूनही लागवड क्षेत्र वाढतच आहे.

Onion Cultivation
Onion Cultivation : अहिल्यानगरला पंचावन्न हजार हेक्टरने कांदा क्षेत्रवाढ

खरीप, लेट खरीप, रब्बी व उन्हाळी मिळून साधारणपणे पावणे ते दोन लाख हेक्टरवर कांद्याचे क्षेत्र असते. यंदा त्यात बऱ्यापैकी वाढ होताना दिसत आहे. खरिपाचे २० हजार २६८ हेक्टर सरासरी हेक्टर क्षेत्र असताना ३६ हजार ३८१ हेक्टरवर लागवड झाली. गेल्या वर्षी १५ हजार ५८७ हेक्टरवर लागवड झाली होती. लेट खरिपात ५५ हजार ३४८ हेक्टर सरासरी क्षेत्र असताना १ लाख १६ हजार ३१७ हेक्टरवर लागवड झाली.

Onion Cultivation
Onion Cultivation : घाटनांद्रामध्ये कांदा लागवडीला शेतकऱ्यांची पसंती

गेल्या वर्षी ४५ हजार ५१४ हेक्टरवर लागवड झाली होती. तर रब्बीचे १ लाख १९ हजार ५६१ हेक्टर सरासरी क्षेत्र निश्चित आहे. यंदा आतापर्यंतच रब्बीत १ लाख ४० हजार ९८९ हेक्टरवर लागवड झाली आहे. गेल्या वर्षी १ लाख ४० हजार ७३५ हेक्टरवर लागवड झाली होती. अजूनही काही भागात लागवडी सुरू आहे.

वर्षभरातील कांदा लागवड (हेक्टर)

अहिल्यानगर ः २७,६४६, पारनेर ः ४९,०५२, पाथर्डी ः १८,४८२, कर्जत ः २७,८४९, जामखेड ः १५,६४९, श्रीगोंदा ः ४१,३१८, श्रीरामपूर ः ४,३४६, राहुरी ः ३,९५५, नेवासा ः २५,३६२, शेवगाव ः १२,१७९, संगमनेर ः२,९१३, कोपरगाव ः १३,६२०, अकोले ः ९,०६०, राहाता ः ४,७५२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com