Cashew Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Rate : काजू बी दर वाढीसाठी तीन जिल्ह्यांत आंदोलन करण्याचा निर्णय

Cashew Season : काजू बीला २०० रुपये हमीभाव मिळावा, या मागणीसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील काजू उत्पादकांनी विविध प्रकारची आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ पवार

Sindhudurg News : काजू बीला २०० रुपये हमीभाव मिळावा, या मागणीसाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतील काजू उत्पादकांनी विविध प्रकारची आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाची सुरुवात १० फेब्रुवारीपासून करण्यात येणार असल्याची माहिती फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी दिली.

काजू हे कोकणातील उत्पन्नाचे मुख्य पीक असून, काजू बीला हमीभाव नसल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील काजू उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. आतापर्यंत काजू उत्पादकांनी काजू बी ला हमीभाव मिळावा, काजूवरील आयात शुल्क वाढवावा अशा मागणी शासनाकडे केलेल्या आहेत. परंतु शासनाकडून काहीही सकारात्मक निर्णय झालेला नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील काही काजू बागायतदारांची कणकवलीत बैठक झाली.

या बैठकीत काजूला हमीभाव मिळण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी लढा उभारण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील काजू बागायतदारांनी आता एकाच वेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. १० फेब्रुवारीपासून या लाक्षणिक उपोषण, आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे. काजू बीला प्रतिकिलो १२२.५० पैसे उत्पादन खर्च आहे.

काजू बीचा दर १२० ते १०० रुपये आहे. पुरुष मजुराची मजुरी ५०० रुपये, तर महिलांची ३०० रुपये मजुरी आहे. अशा परिस्थितीमुळे काजू बागायतदार सर्व बाजूने आर्थिक संकटात येत आहे. त्यामुळे काजू बीला किमान २०० रुपये हमीभाव देण्यात यावा अन्यथा १० फेब्रुवारीपासून तीनही जिल्ह्यांत आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी दिला आहे.

परकीय काजूगर आणि सिंधुदुर्गातील काजूगर एकत्र मिसळून कारखानदारांकडून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे शासनाने कारखानदारांना काजूगर पॅकिंगवर आयात केलेला काजूगर आणि जिल्ह्यातील जीआय काजूगर असा उल्लेख करण्याची सक्ती करावी.
- विलास सावंत, अध्यक्ष, फळबागायतदार संघ, सिंधुदुर्ग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT