Sugarcane FRP agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सांगलीतील कारखानदारांचा निर्णय ‘स्वाभिमानी’ला अमान्य

Sugarcane Season : कडेगाव येथे साखर कारखानदारांची बैठक झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्यासह संघटनेच्या प्रतिनिधींनी साखर कारखानदारांच्या बैठकीतील निर्णय अमान्य असल्याचे सांगितले.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चालू गळीत हंगामातील उसाला पहिली उचल प्रतिटन ३ हजार १०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी अशी माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र कारखानदारांनी घेतलेला हा निर्णय अमान्य असल्याचे सांगितले.

कडेगाव येथे डॉ. कदम यांच्या पुढाकाराने रविवारी (ता. २६) रात्री जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक झाली. यात उसाला प्रतिटन ३ हजार १०० शंभर रुपये पाहिली उचल देण्याचा निर्णय सर्वानुमते झाला. संजय पाटील, क्रांती कारखान्याचे माजी अध्यक्ष आमदार अरुण लाड, मानसिंगराव नाईक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते.

डॉ. कदम म्हणाले, ‘‘ज्या कारखान्यांनी मागील वर्षी शेतकऱ्यांना प्रतिटन रुपये २ हजार ९०० पेक्षा जादा ऊसदर अदा केला, त्यांनी प्रतिटन ५० रुपये व २ हजार ९०० पेक्षा कमी दर अदा केलेल्या कारखान्यांनी मागील वर्षाच्या एफआरपीपेक्षा किमान रुपये १०० रुपये जादा दर अदा करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव दाखल करावा. शासन स्तरावरून त्यास मंजुरी प्राप्त झाल्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याचा निर्णय या वेळी सर्वानुमते घेण्यात आला.’’

कोल्हापूर पॅटर्नची मागणी; अन्यथा आंदोलन

कडेगाव येथे साखर कारखानदारांची बैठक झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे व कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्यासह संघटनेच्या प्रतिनिधींनी साखर कारखानदारांच्या बैठकीतील निर्णय अमान्य असल्याचे सांगितले.

कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे कारखानदारांनी एफआरपी अधिक शंभर रुपये चालू वर्षीचा ऊस दर जाहीर करावा. मागील वर्षी ३ हजार पेक्षा कमी ऊसदर दिलेल्या कारखान्यांनी १०० रुपये जादा अदा करावेत, ३ हजार पेक्षा जादा ऊस दर दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये जादा अदा करावेत, अन्यथा ‘स्वाभिमानी’ आंदोलन आणखी तीव्र करेल, असा इशारा खराडे यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT