Pm Kisan Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Scheme : आधार सीडिंगसाठी २५ मेपर्यंत डेडलाइन

PM Kisan Yojana : केंद्र शासनानंतर राज्य शासनाने पीएम किसान योजना राबविण्याची घोषणा केल्यानंतर याची अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे.

Team Agrowon

PM Kisan Yavatmal News : केंद्र शासनानंतर राज्य शासनाने पीएम किसान योजना राबविण्याची घोषणा केल्यानंतर याची अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी व आधार सीडिंग करणे महत्त्वाचे होते.

अजूनही जिल्ह्यातील जवळपास ३६ हजार शेतकऱ्यांनी आधार सीडिंग केले नसून, २५ मे ची डेडलाइन शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.

केंद्र शासन दरवर्षी शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत करते. राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य शासनानेही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदतीचे आश्‍वासन दिले होते.

शेतकऱ्यांना आधार म्हणून राज्य शासन मदत करणार आहे. यानंतर योजनेच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. योजनेसाठी शेतकऱ्यांनी बँक खात्याची ई-केवायसी व आधार सीडिंग करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे आधार सीडिंग व ई-केवायसी झाली आहे. अजूनही जिल्ह्यातील ३६ हजार ८०६ पात्र शेतकऱ्यांचे ई-केवायसी व आधार सीडिंग झालेले नाही. त्यामुळे आता या शेतकऱ्यांचे ई-केवायसी करण्याची जबाबदारी बँकेला देण्यात आली आहे.

२५ मेपर्यंत शेतकऱ्यांचे आधार सीडिंग करावे लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ३६ हजार शेतकऱ्यांपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक २५ हजार २८० शेतकरी शिल्लक आहेत. या शेतकऱ्यांचे आधार व ई -केवायसी झालेली नाही.

शासनाने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून माहिती मागितली आहे. ज्या बँकेचे आधार सीडिंगच्या कामांची गती कमी आहे. अशा बँकांनी वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT