Jayakwadi Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Jaykwadi Dam Water Issue : ‘जायकवाडी’चा मृतसाठा वापरावा

Jaykwadi Water Crisis : यंदा अपुरा पाऊस पडल्याने धरणांमध्ये पुरेसा साठा नाही. अशा परिस्थितीत मराठवाडा व नाशिक-अहमदनगर असा पाण्याचा संघर्ष उभा राहिला आहे.

मुकूंद पिंगळे

Nashik News : यंदा अपुरा पाऊस पडल्याने धरणांमध्ये पुरेसा साठा नाही. अशा परिस्थितीत मराठवाडा व नाशिक-अहमदनगर असा पाण्याचा संघर्ष उभा राहिला आहे. जायकवाडी प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून २०१५ मध्ये ०.५ टीएमसी पाणी वापरण्याची परवानगी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिली होती.

त्याचप्रमाणे मृतसाठ्यातून २०१२, २०१५ व २०१८ मध्ये सुमारे दहा टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे. याच मृतसाठ्याचा वापर पुन्हा केल्यास नाशिकमध्ये पाणीटंचाई निर्माण होणार नाही, असा स्पष्ट अभिप्राय जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे नोंदविला आहे.

पाणी संघर्षात गोदावरी पाटबंधारे विभागाने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे आदेश दिल्याने तीव्र झालेल्या संघर्षात मराठवाड्यातील नेत्यांचा पाणी हिसकावून घेण्यासाठी आततायीपणा दिसून येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२०१२ व २०१५ मध्ये जायकवाडीचा मृत पाणीसाठा उचलला असताना नाशिकच्या पाचशे दशलक्ष घनफूट पाण्यासाठी दबाव आणला जात आहे. यंदाच्या हंगामात नाशिक जिल्ह्यातच अपुरा पाऊस पडला.

जवळपास ३० ते ३५ टक्क्यांची पाण्याची तूट निर्माण झाली. त्यामुळे काही धरणे भरली असली तरी बरीचशी धरणे निम्मीदेखील भरली नाहीत. मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणासाठी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने पाण्याचे सूत्र ठरवून दिले आहे.

जायकवाडी धरणात पाण्याची ठरावीक टक्केवारी असल्याने पाण्याचा कोटा पूर्ण करण्यासाठी नाशिक व नगरच्या धरणांमधून पाणी सोडावे, असे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे सूत्र आहे.

त्यानुसार नगरमधील निळवंडे धरणातून ८.६ टीएमसी, तर गंगापूर धरणातून ०.५ टीएमसी पाणी सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, परंतु या निर्णयाला उच्च न्यायालयात हरकत घेण्यात आली. गंगापूर धरणातून ०.५ टीएमसी पाणी सोडण्यास आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी विरोध केला आहे.

पाणी सोडण्यास विरोध नाही, परंतु गंगापूर धरणात अपुरा पाणीसाठा असल्याने दारणा धरणातून पाणी सोडावे, अशी त्यांची मागणी आहे. या विरोधात उच्च न्यायालयात धावदेखील घेण्यात आली आहे. ५ डिसेंबर २०२३ ला न्यायालयात पुन्हा सुनावणी आहे.

आदेश दाबल्याने संशय

निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी ८.६ टीएमसी पाणी सोडण्यासंदर्भात दाखल हस्तक्षेप याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे जायकवाडीसाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

परंतु यापूर्वी देखील टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असताना मृत साठ्यातून पाणी उपसण्यास परवानगी असताना नाशिक व नगरच्या पाण्यासाठी हट्ट व गोदावरी पाटबंधारे विकास मंडळाकडून पाणी सोडण्यासाठी तत्काळ पावले उचलण्यात आल्याने गोदावरी पाटबंधारे विभागाने २०१२ व १५ मधील आदेश दाबून ठेवण्यावर संशय व्यक्त होत आहे.

पाणी जपून का वापरले नाही?

‘एल निनो’ वादळामुळे राज्य शासनाने पाणी जपून वापरण्याचे पत्र स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. नाशिक महापालिकेकडून पाणी जपून वापरण्यासाठी काटेकोर नियोजन करण्यात आले; परंतु छत्रपती संभाजीनगर महापालिका, तसेच जायकवाडी धरणावरील पालिकांनी पत्रानुसार कारवाई न करता नियमित पाण्याचा उपसा सुरूच ठेवला.

राज्य शासनाचे पत्र राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू असताना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने त्याचवेळी पाणी जपून का वापरले नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

Daytime Electricity : शेतीला दिवसा वीज द्या, महावितरणला दिले निवेदन

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Assembly Election Result : कोल्हापुरातून मुश्रीफ, महाडिक आघाडीवर तर सांगलीत जयंत पाटील, विश्वजीत कदम, गाडगीळ यांची आघाडी

SCROLL FOR NEXT