Ration Shop Agrowon
ॲग्रो विशेष

Ration Shop : रेशनसाठी नागरिकांची दिवसभर उपासमार

Ration Grain : श्रीवर्धन तालुक्यातील ४८ रास्तभाव धान्य दुकानदार आणि सुमारे १५ हजार शिधापत्रिकाधारक यांना सर्व्हर डाऊनच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

Team Agrowon

Diveagar News : रास्तभाव धान्य दुकानांमध्ये ई-पॉस मशीन सर्व्हर डाऊनमुळे बंद आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून वारंवार सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे रास्तभाव धान्य दुकानदार जुलै महिन्याचे धान्य अद्यापही वितरित करण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

शिवाय घरातून सकाळीच बाहेर पडलेल्या लाभार्थ्यांना दिवसभर उपाशी राहून वाट बघत बसावी लागत आहे. शिवाय दोन महिन्यांचे धान्य मिळाले नसल्याने गरीब कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील ४८ रास्तभाव धान्य दुकानदार आणि सुमारे १५ हजार शिधापत्रिकाधारक यांना सर्व्हर डाऊनच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सर्वच अंत्योदय, पिवळे, केसरी लाभार्थी महिन्याच्या सुरुवातीला शिधावाटप दुकानांत येत आहेत.

कित्येक दिवस दुकानावरती येऊन हेलपाटा मारून पुन्हा परत घरी जावे लागत आहे. त्यासाठी रोजची मोलमजुरी सोडून धान्य मिळवण्यासाठी रांग लावावी लागते. यामुळे गरिबांसमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील सर्वच शिधापत्रिकाधारक धान्य कधी मिळेल याकडे लक्ष देऊन आहेत. दुकानात धान्य असल्याने आज मिळेल, उद्या मिळेल, असे करत रोजच लाभार्थी येतात. ग्राहकांशी रोज वाद होतात याचे वाईट वाटते. याकडे सरकारने तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. सर्वच पातळीवर याबाबतीत निवेदने देण्यात आली आहेत.
- अच्युत आपटे, रास्त धान्य दुकानदार
जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत ऑफलाइन धान्यवाटप करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याला अनुसरून आम्ही संबंधित दुकानात कोणता कर्मचारी, कोणत्या गावात राहणार, याबाबत पत्र काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. उद्यापासून प्रत्यक्षात धान्यवाटप सुरू होईल.
- महेंद्र वाकलेकर, तहसीलदार, श्रीवर्धन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jal Shakti Hackathon 2025: जल व्यवस्थापनासाठी ‘जलशक्ती हॅकेथॉन-२०२५’

NAFED Procurement Center: ‘नाफेड’च्या सोयाबीन खरेदी केंद्रांवर शुकशुकाट

Soybean Future Ban: शेतीमालावरील वायदेबंदी उठविण्याच्या हालचाली

Agriculture Electricity: शेतकऱ्यांना विजेपासून वंचित ठेवणे वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग

Sugar Production: साखर उत्पादनात महाराष्ट्रच अव्वल

SCROLL FOR NEXT