Pune News: पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम २०२४ मध्ये मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. परभणी जिल्ह्यात महसुली क्षेत्र अस्तित्वात नसलेल्या ११ गावांमध्ये तब्बल १० हजारांहून अधिक बनावट पीक विमा अर्ज भरण्यात आल्याचे उघड झाले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या तपासणीत हा प्रकार उघड झाला आहे..महसूल अभिलेखानुसार संबंधित ११ गावांना कोणतेही भौगोलिक क्षेत्र उपलब्ध नसतानाही या गावांची नोंद पीक विमा पोर्टलवर करण्यात आली होती. याचाच गैरफायदा घेत एकूण १० हजार ६४ अर्जांद्वारे २३ हजार २०१ हेक्टर क्षेत्रावर बोगस पीक विमा उतरविण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणात तब्बल ९६ सामायिक सेवा केंद्रांच्या आयडीचा वापर करण्यात आला..Crop Insurance Scam: विनयकुमार आवटेंची ‘एसआयटी’ चौकशी करा.खोटे ७/१२ व ८-अ दाखले तयारकरून सरकारची फसवणूकधक्कादायक बाब म्हणजे, अस्तित्वात नसलेल्या क्षेत्रासाठी खोटे ७/१२ व ८-अ सारखे महसुली दाखले तयार करून अर्ज भरण्यात आले. कृषी विभागाच्या पडताळणीत चुकीचे अर्ज भरणाऱ्या केंद्रांपैकी ८९ केंद्रे राज्यातील विविध जिल्ह्यांतील असून, ७ केंद्रे राज्याबाहेरील असल्याचेही निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या गैरप्रकारामागे मोठे जाळे कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..Crop Insurance Scam: पीकविम्यासाठी गाव हे एकक हवे.जिल्हानिहाय ९६ केंद्रांपैकी बीड (३६), परभणी (२५), लातूर (६), अकोला (३), संभाजीनगर (३), नांदेड (३), पुणे (३), बुलढाणा (२), हिंगोली (२), जालना (१), नाशिक (१), पालघर (१), सातारा (१), ठाणे (१) आणि यवतमाळ (१) या जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच उत्तर प्रदेशातील अमेठी (१), बांदा (१), हरदोई (२) आणि हरयाणातील रोहतक (२) येथेही ही केंद्रे आढळून आली आहेत..कारवाईचे आदेशदरम्यान, कृषी आयुक्तालयातून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना अवैध नोंदणी करणाऱ्या केंद्रधारकांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित सामायिक सेवा केंद्रे तातडीने बंद करण्यात आली असून, सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.