Maharashtra Assembly  Agrowon
ॲग्रो विशेष

Special Assembly Session : राज्य विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाची तारीख ठरली ; मराठा आरक्षण टप्प्यात?

Maratha Reservation : मराठा समाजाला आम्ही टिकणारे आरक्षण देण्यासाठी फेब्रूवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेतले जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती.

Mahesh Gaikwad

Pune News : मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी फेब्रूवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेतले जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात केली होती.

त्यानुसार आता राज्य सरकारच्या विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्याची तयारी सुरू केली आहे. हे विशेष अधिवेशन १५ फेब्रूवारीला बोलविण्यात येणार असल्याची माहिती आहे.

विशेष अधिवेशनामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडण्यात येणार आहे. राज्य मागासवर्गाने गेल्या महिन्याभरात मराठा समाजाचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या आधारे मराठा आरक्षणाचे विधेयक विशेष अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचना काढली होती. त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. या हरकतींचा विचार करून विधानसभेत विधेयक मांडले जाण्याची शक्यताआहे.

तसेच २ फेब्रवारीपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यात मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणचा अहवालही अधिवेशनात मांडण्यात येईल.

दरम्यान, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितले होते. यासाठी विशेष अधिवेशन बोलविण्यात येईल, असेही शिंदे यांनी सांगितले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT