Dam water level  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : धरणांना कोरडं ! सप्टेंबर उजाडूनही देशातील धरणं २२ टक्के रिकामी

Dam water level : माॅन्सूनच्या पावसाने राज्यात पाठ फिरवल्याने अनेक धरणे पावसाविना कोरडीठाक पडली आहे. सप्टेंबर उजाडून राज्यातली नव्हे तर देशातील धरणात २२ टक्के इतके कमी आहे.

Swapnil Shinde

Dam Water : सप्टेंबर महिना उजाडला तरी राज्यात म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वच विभागातील धरणं कोरडी पडू लागली आहेत. पावसाअभावी खरीप हंगाम वाया जाण्याची शक्यता आहे. हे पाणीसंकटाचे सावट फक्त महाराष्ट्रावर नाही तर संपूर्ण देशावर आहे. केंद्रीय जल आयोगाने प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार गतवर्षाच्या तुलनेत यंदा देशभरातील धरणात तब्बल २२ टक्कांनी पाण्याची पातळी घटली आहे.

यंदा माॅन्सूनच्या पावसाने उशीर केला. त्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस झाला नाही. सध्या राज्यातील धरणातील साठा ६४.७५ टक्के आहे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा २० टक्क्यांनी कमी झाला आहे. राज्यात ५ सप्टेंबरपर्यंत केवळ ४ धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडीत यंदा 33 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा राज्यातील पाणीसंकट गडद होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय जल आयोगानुसार, देशातील १५० धरणांमध्ये पाण्याची पातळी २२ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या १० वर्षांच्या साठ्याच्या तुलनेत हे प्रमाण १० टक्के कमी आहे.

महाराष्ट्रातच नव्हे तर, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, मध्यप्रदेश, गुजरात, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या राज्यातील धरणांमधील पाण्याची पातळी घटली आहे. ऑगस्ट अखेरीस देशातील १५० धरणांमध्ये ११३.४१७ अब्ज घनमीटर (बीसीएम) होता. गेल्यावर्षी या धरणांमध्ये १४६.८२८ बीसीएम जलसाठा होता. गेल्या १० वर्षांची सरासरी साठा पातळी १२५.११७ बीसीएम आहे.

जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात पावसाची तूट पडली. पण, सप्टेंबर महिन्यात मान्सूनच्या पावसाचं पुनरागमन होईल. देशातील मध्य आणि दक्षिण भारतात चांगला पाऊस पडेल, असा हवामान विभागच्यावतीने अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT