Grape Orchard Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Crop Damage : पूर्व भागात द्राक्षबागा, गहू, हरभऱ्याचे नुकसान

अनेक शेतकऱ्यांच्या फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, काकडी, कांदा, गहू, हरभरे, मसूर आदी पिकांसह बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Nashik News : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील टाकेद परिसरात गेले तीन दिवस विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे परिसरातील शेतीपिकांचे मोठे नुकसान (Agriculture Crop Loss) झाले आहे.

सोमवारी (ता. ६) दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पूर्व भागातील टाकेद परिसरात मोठ्या प्रमाणात अवकाळीने थैमान घातले. काही भागात थोड्या प्रमाणात गारपीट देखील झाली.

अवकाळी पावसामुळे या भागातील भरवीर, साकूर, पिंपळगाव मोर, बेलगाव, धामणगाव, धामणी, खेड, वासाळी, खडकेद, इंदोरे, आंबेवाडी, बारशिगवे, सोनोशी, मायदरा, टाकेद अडसरे खुर्द भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

अनेक शेतकऱ्यांच्या फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, काकडी, कांदा, गहू, हरभरे, मसूर आदी पिकांसह बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले.

तर पांढुर्ली भागातील शेतकऱ्यांचे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे गहू, हरभरे काढणीचे काम चालू होते.

टाकेद परिसरातील वीज पुरवठादेखील पावसामुळे दोन दिवस खंडित होता. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या अवकाळी पावसामुळे पिंपळगाव मोर ते टाकेद पूर्व भागात अनेक ठिकाणी विजेचे खांब, झाडे उन्मळून कोसळली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Lalya: कपाशीवर लाल्याचा प्रादुर्भाव? योग्य कारण ओळखूनच करा उपाय

Water Storage Crisis: सांगली जिल्ह्याच्या जलसाठ्यावर संकटाचे ढग

Indian Railways : अहिल्यानगर-बीड रेल्वे प्रवास होणार सुपरफास्ट

Toll Waiver: गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी, यंदाही टोलमाफी, पास उपलब्ध

Devlali Danapur Express : देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची १०० वी फेरी पूर्ण

SCROLL FOR NEXT