Crop Damage
Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop Damage : खालापुरात पावसाचा रब्बी पिकांना फटका

Team Agrowon

Khalapur News : खालापूर तालुक्यात प्रचंड जलसंपदा असल्याने उन्हाळी शेती, भाजीपाला आणि कडधान्य पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या हे पीक बहरले असले तरी, कधीही भरून येणारे आभाळ आणि बरसणारा पाऊस यामुळे रब्बी पिकांना फटका बसत आहे. यात छोट्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

खालापुरात कडधान्य आणि भाजीपाला लागवडीचे सरासरी ४८३.५० हेक्टरी क्षेत्र आहे. त्यापैकी ३४३.५२ हेक्टर क्षेत्रात कडधान्य लागवड होते. भाजीपाला लागवडीचे क्षेत्र ११६.५८ हेक्टर आहे.

येथील शेतकरी कडधान्य पिकात प्रामुख्याने हरभरा, मुग, मटकी, वाल, चवळी, तूर व उडीद लागवड करतात. भाजीपाल्यामध्ये पडवळ, वांगी, भेंडी, काकडी, कारली, मिरची, घोसाळी आणि इतर भाजीपाला व कलिंगड लागवड केली जाते.

धरणातील कालव्याच्या पाण्यावर, नदी आणि विहिरीतील पाण्यावर दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतो. चौक, जांभिवली, विणेगाव, सावरोली, वणवे, नडोदे भागात रब्बी पिकांची लागवड जास्त आहे.

तालुक्यातील भाजीपाला स्थानिक बाजारपेठेसह पुणे, पनवेल भागात विक्रीला जात असल्याने शेतकऱ्याच्या गाठीला चार पैसे जमा होतात. परंतु यंदा वारंवार हजेरी लावलेल्या पावसाने कापणीला आलेले भातपीक तसेच भाजीपाला उत्पादनावर परिणाम होत आहे.

शेतकरीवर्ग समाधानी

रोहा : तालुक्यातील डोलवहाळ बंधाऱ्याच्या माध्यमातून कालव्यातील पाण्यावर काही भागांत उन्हाळी हंगामातील भातशेती पिकवली जाते. उन्हाळी हंगामातील भातशेतीचे पीक हे शेतकऱ्यांच्या हातात असल्याने ते त्यांना चांगले परवडते.

कालव्याच्या माध्यमातून शेतीला आवश्यक पाणीपुरवठा होत असल्याने पीकसुद्धा चांगले येते. साधारणपणे डिसेंबर महिन्यात कालव्याचे पाणी उपलब्ध झाले, तर ९० ते १२० दिवसांत भातपिके तयार होऊन कापणी लायक होतात.

पाणी उशिरा मिळाले, तर पहिल्याच येणाऱ्या मोसमी पावसामुळे भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता असते. या वर्षी पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे योग्य नियोजन झाल्याने भातशेती बहरली आहे. मात्र, अधून मधून दिसणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची टांगती तलवारही त्यांच्या डोक्यावर कायम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Export Ban : न्यायालयाने दिला तांदूळ निर्यातदारांच्या बाजूने निर्णय; केंद्र सरकारला सुनावले!

Mango Festival : कोल्हापूर, सांगलीत ‘आंबा महोत्सव’

Indian Spices Product Ban : आधी हाँगकाँग-सिंगापूर आणि आता शेजारच्या देशाने घातली भारतीय मसाल्यांच्या विक्रीवर बंदी

Pre Monsoon Rain : पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण

Panjab Stubble Burning : पंजाबमध्ये बिनधोकपणे गव्हाची अवशेष जाण्यावर भर; जम्मू-काश्मीरच्या राजौरीत जंगलात आग

SCROLL FOR NEXT