Paddy Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop Damage : कालव्याच्‍या पाण्यामुळे खांबमध्ये भातशेतीचे नुकसान

Paddy Crop : कोलाड खांब परिसरात मॉन्सूनोत्तर पावसाने आधीच बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

Team Agrowon

Roha News : कोलाड खांब परिसरात मॉन्सूनोत्तर पावसाने आधीच बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. दिवाळीत पाऊस थांबल्याने शेतकरी शेतातील उरलीसुरली धान कापणी, झोडणी, मळणीत व्यग्र असतानाच शुक्रवारी (ता. ९) रात्री अचानक कोलाड पाटबंधारे खात्याने कुंडलिका नदी सिंचनातून उजवा तीर कालव्यात पाणी सोडले.

परिणामी परिसरातील भातकापणी केलेल्या शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

खांब परिसरातील शेतकऱ्यांनी भातकापणी सुरू केली आहे. दरम्‍यान पाटबंधारे खात्याने अचानकपणे कालव्यात पाणी सोडल्याने शेतात पाणी साचले आहे. त्‍यामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणावर खांब, शिरवली, मुठवली, नडवली भागातील धानाचे नुकसान झाले आहे.

यामुळे परिसरातील शेतकरी अक्षरशः चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. त्‍यामुळे याला जबाबदार कोण? असा सवाल शेतकरी करीत आहेत.

शेतकरी वर्ग पाटबंधारे खात्याच्या विरोधात संताप व्यक्त करत आहे. तसेच संबंधित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: कोथिंबीरचा भाव टिकून, सोयाबीनचा भाव दबावातच, केळीची आवक टिकून, बाजरी नरमली तर काकडीला उठाव

Cloudy Weather : पाऊस, ढगाळ वातावरणाचा फटका

India Rice Exports: भारताची २६ देशांत तांदूळ निर्यातीची तयारी, २५ हजार कोटींचे करार शक्य, काय आहे योजना?

Labor Shortage : मजूर टंचाईपुढे शेतकरी हतबल

Monsoon Rain: राज्यात वादळी पावसाचा अंदाज; पुढील ५ दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT