Paddy Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop : भोरमध्ये पावसामुळे भातशेतीचे नुकसान

Crop Damage : तालुक्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे भाटघर धरण खोऱ्यात आणि भुतोंडे खोऱ्यात भातखाचरांच्या ताली पडल्या असून भातशेतीचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Pune News : तालुक्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे भाटघर धरण खोऱ्यात आणि भुतोंडे खोऱ्यात भातखाचरांच्या ताली पडल्या असून भातशेतीचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांपासून तालुक्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु आहे.

तालुक्याच्या पश्चिमेकडील भाटघर धरण आणि नीरा-देवघर धरण खोऱ्यासह भूतोंडे खोरे, वेळवंड खोरे, हिर्डोशी खोरे, आंबवडे खोरे आणि वीसगाव खोरे या भागात पावसाचे प्रमाण जास्त आहे. शनिवारी (ता. २४) झालेल्या मुसळधार पावसामुळे भूतोंडे खोऱ्यातील कांबरे बुद्रुक आणि कांबरे खुर्द या गावातील शेतकऱ्यांच्या डोंगरालगत असलेल्या भातशेतीचे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसामुळे भातखाचरांच्या ताली पडल्या आहेत तर काही ठिकाणी शेतीचे बांधासह भाताचे लावलेले पीकही वाहून गेले आहे. प्राथमिक माहितीनुसार कांबरे बुद्रुक आणि कांबरे खुर्द मधील शेतकरी नारायण दगडू चिकणे, पांडुरंग लक्ष्मण चौधरी, तुकाराम हरिश्चंद्र चौधरी, धर्मा सुकाळे, संदीप सुकाळे, समीर सुकाळे, अनंता जंगम आणि संतोष गणपत सुकाळे या शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे.

कांबरे खुर्द गावाबरोबर अनेक गावातील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतक-यांची संख्या वाढणार आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मुसळधार पावसामुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येणार असून शासनाच्या नियमानुसार पुढील नुकसानभरपाईची प्रक्रीया पूर्ण केली जाईल.
- राजेंद्र नजन, तहसीलदार, भोर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT