Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Crop : सिंधुदुर्गात भातपिके कलंडली

Heavy rain : सतत पडणाऱ्या पावसामुळे परिपक्व झालेल्या सुमारे ३० ते ४० टक्के भातपिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक भागांत सोमवारी (ता. १६) सायकांळी विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस झाला. सतत पडणाऱ्या पावसामुळे परिपक्व झालेल्या सुमारे ३० ते ४० टक्के भातपिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू आहे. रविवारी (ता. १५) जिल्ह्याच्या अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. काही भागांत गारपिटीसह पाऊस झाला होता. तर वादळी वाऱ्यांमुळे वैभववाडीतील नापणे येथे नुकसान झाले होते. सोमवारी (ता. १६) सकाळपासनू जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. उष्मा जाणवत होता. दुपारी साडेतीनपासून जिल्ह्यात विजांचा कडकडाट सुरू झाला. वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आणि दोडामार्ग या तालुक्यांत वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरू झाला. वैभववाडीच्या पूर्वपट्ट्याला पावसाने झोडपून काढले. काही भागांत वाऱ्यांचा वेगदेखील वाढला होता.

जिल्ह्यात ३० ते ४० टक्के भातपीक परिपक्व स्थितीत असून या पिकांची कापणी करणे आवश्यक आहे. वाऱ्यामुळे काही ठिकाणी पिके जमिनीवर कलंडली आहेत. या पिकांची कापणी वेळेत होणे आवश्यक आहे. दोन दिवस पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळीदेखील ढगाळ वातावरण होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT