Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Avkali Paus : आंबा बागायतदारांना वादळी पावसाचा फटका

आंब्याला चांगला मोहर आला होता. मात्र अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Raigad News : सुधागड तालुक्यात सोमवारी (ता. ६) आलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) आंबापिकाला फटका बसला आहे. मोहरांनी बहरलेले व काही ठिकाणी कैऱ्या धरलेले आंबापिक पूर्णत: धोक्यात आले आहे.

यामुळे आंबा बागायतदार संकटात सापडले आहेत. तालुका कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत सहा गावांतील सहा हेक्टरवरील आंबापिकाचे नुकसान झाले आहे.

यावर्षी आंब्याला चांगला मोहर आला होता. मात्र अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.

जिल्ह्यातील आंबा पिकांवर अवकाळी पाऊस व हवामानातील बदल आदींबाबत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आंबा पीक विमा योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

यंदा चांगले उत्पन्न हाती येईल, अशी परिसरातील सर्वच बागायतदार शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाच्छापूर येथील आंबा बागायतदार संजय घोसाळकर यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT