Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage by Wild Animals: देवळेत गव्यांकडून आंबा बागांचे नुकसान

Ratnagiri Farmer Issue: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवळे व चाफवली परिसरात गवारेड्यांच्या कळपांमुळे आंबा व काजू बागांचे प्रचंड नुकसान होत असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभागाच्या तात्काळ हस्तक्षेपाची गरज आहे.

राजेश कळंबटे

Ratnagiri News: संगमेश्वर तालुक्यातील देवळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या आंबा बागांचे गवारेड्यांनी अतोनात नुकसान केले असून यावर वन विभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

देवळे-चाफवली गावातील आंब्याच्या बागांतून गवारेड्यांचे कळपच्या कळप येत असून हातातोंडाशी आलेल्या आंबा पिकांचे मोठे नुकसान करत आहेत. यावर कोणती उपाययोजना करता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. हे गवारेड्यांचे कळप आंबा बागांत घुसतात आणि जिथपर्यंत मान पोहोचते तिथपर्यंतचा आंबा ओढून खातात किंवा फांद्यांना घासून फांदी हलवतात व मोडतातही,

त्याने आंबा खाली पडला की तो खातात यामुळे आंबा बागातदारांचे फार मोठे नुकसान होत असून यावर पर्यायच मिळत नसल्याने व ते हाकलूनही जात नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. काजू बागायतीमध्येही गवारेडे असेच फार मोठे नुकसान करत असून छोटी-मोठी काजूची झाडे शिंगात अडकवून उपटून टाकतात. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे.

देवळे गावातील सलीम खतीब, नाझीम खतीब, चाफवली येथील लक्ष्मण चाळके, प्रकाश चाळके यांच्या आंब्याच्या बागांचे गवारेड्यांनी फार मोठे नुकसान केले आहे. हे गवे फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही बागांतून फिरू लागले आहेत. त्यामुळे यांचा बंदोबस्त कसा करावा या विवंचनेत या भागातील शेतकरी सापडले आहेत.

याबाबत वन विभागाकडे तक्रार केल्यास त्यासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यासच वेळ लागतो. कृषी विभाग, तलाठी कार्यालय, घोषणापत्र, सात-बारा, आठ अ, भूमी अभिलेखचा नकाशा, अशा अनेक गोष्टींचा पाठपुरावा करताना व सह्या घेताना, पंचयाद्या घालताना शेतकरी हैराण होतो. त्यामुळे तक्रारही करायला शेतकरी पुढे येत नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT