Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान

Latest Rain Update : पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने काही ठिकाणी दिलासा दिला आहे, तर काही ठिकाणी नुकसान झाले आहे. गुरुवारी (ता. २८) आणि शुक्रवारी (ता. २९) सायंकाळी जिल्ह्याच्या विविध भागांत सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतांमध्ये पाणी साठले होते. तर, काही ठिकाणी ओढे नाले तुडुंब भरून वाहत होते. या पावसाने खरिपातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या दोन दिवसांच्या घाटमाथ्यावरील पावसामुळे धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यामध्ये वाढ होऊ लागल्याने धरणांतून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस व वडज, डिंभे धरणांमधून जास्त प्रमाणात येणाऱ्या येव्यामुळे धरणाची पाणीपातळी वाढत असल्याने घोड नदी पात्रामध्ये शनिवारी (ता. ३०) सकाळी सात वाजता सांडव्याद्वारे १ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात सुरुवात केला आहे.

तर खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १ हजार ७१२ क्युसेक विसर्ग वाढवून शनिवारी (ता. ३०) पहाटे ३ वाजता २ हजार ५६८ क्युसेकने करण्यात आला असल्याचे पाटबंधारे विभागाचे मोहन भदाने यांनी कळविले आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी धामणी परिसरात अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवारी (ता. २८) सायंकाळी ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र अचानक झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी नुकसानदेखील झाले आहे.

पूर्व भागातील धामणी, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी, शिरदाळे, पहाडदरा, रानमळा, वाळुंजनगर, खडकवाडी ही आठ गावे कायमची दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात.

या भागातील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून, डिसेंबर महिन्यांनंतर परिसरातील काही वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी शासनाला टँकर सुरू करावे लागतात.

या भागात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने सप्टेंबर महिन्यातसुद्धा टँकर सुरू होते. मात्र गुरुवारी (ता. २८) झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने परिसरातील ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला होता. काही ठिकाणचे बंधारे तुडुंब भरून वाहत होते.

पूर आल्याने पिकांचे नुकसान

वळती (ता. आंबेगाव) परिसरात गुरुवारी (ता. २८) दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे बबडी वस्तीतील ओढ्याला पूर आला. ओढ्याचे पाणी वस्तीमधील घरांमध्ये शिरले. अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील घाटी मळा परिसरातील पावसाने दोन डोंगरांच्या मधोमध असलेला माती नाला बांध फुटून वाहून गेल्यामुळे पाण्याचा लोंढा ओढ्याकडेच्या शेतात घुसून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शनिवार (ता. ३०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

पुणे शहर ः १६, हवेली ः ११.६, मुळशी ः २३.५, भोर ः २९.५, मावळ ः १२.९, वेल्हे ः २२.२, जुन्नर ः २९.७, खेड ः ११.४, आंबेगाव ः १३.९, शिरूर ः ६.६, बारामती ः ७.७, दौंड ः १५.६, पुरंदर ः १४.५, इंदापूर ः ०.२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT