Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : सांगोल्यात अवकाळी पावसाने द्राक्ष, आंबा, केळीचे नुकसान

Crop Damages : सांगोला तालुक्यात शनिवारी (ता. ३०) झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या द्राक्ष, आंबा, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले.

Team Agrowon

Solapur News : सांगोला तालुक्यात शनिवारी (ता. ३०) झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या द्राक्ष, आंबा, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याशिवाय वीज पडून पाचेगाव बुद्रूक येथील संगीता भारत बागडे यांचा तर आलेगाव येथे दोन गायींचा जागीच मृत्यू झाला आहे.

सांगोल्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात मोठा उकाडा जाणवत होता. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अनेक भागात पावसास सुरवात झाली. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील आंबा, केळी व द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले.

त्यात काढणीस आलेल्या द्राक्षाचे मोठे नुकसान झाले. पावसाच्या थेंबामुळे द्राक्ष मण्यांना मार लागला, तसेच मणी फुटण्याचे प्रमाणही आहे. त्याशिवाय आंबा बागांचीही गळ झाली आहे, तर काही ठिकाणी केळी बागांचेही नुकसान झाले. पाचेगाव बुद्रूक येथे संगीता भारत बागडे या महिलेच्या अंगावर वीज पडल्याने त्यात भाजून त्यांचा मृत्यू झाला.

त्याशिवाय घेरडी येथे अमोल शिवाजी गरंडे यांच्या शेतात वीज पडल्यामुळे कडबा जळाला. तर आलेगाव येथील सयाजी निवृत्ती बाबर यांच्या शेतातही वीज पडल्याने दोन गायींचा जागीच मृत्यू झाला.

अवकाळी, वादळी पावसामुळे आमच्या द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले. माझ्या काढणीस आलेल्या दोन एकर द्राक्ष बागेचे त्यात नुकसान झाले. आता खर्चही निघतो की नाही, हे माहित नाही.
प्रभाकर खंडागळे, द्राक्ष उत्पादक, रा. संगेवाडी, ता. सांगोला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Early Grape Farming: ‘अर्ली’ची चव आंबटच!

Jowar Farming: सोलापूर जिल्ह्यात ज्वारीची फक्त ४४ टक्केच पेरणी

Fodder Crisis: कोरडा चारा दुरापास्त; माळरानात उपलब्धता कमी

Yashwant Factory Land Deal: ‘यशवंत’ जागा विक्री गैरव्यवहार प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग

Jowar Production: ज्वारीच्या पेरण्यांना पावसाचा फटका; उत्पादन घटीची भीती

SCROLL FOR NEXT