Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain & Crop Damage : अवकाळीचा २०० हेक्टरवरील पिकांना फटका

अवकाळी पाऊस, गारपिटीने जिल्ह्यातील दोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांना मोठा फटका बसला आहे.

Team Agrowon

Chandrapur Crop Damage News : अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपिटीने (Hailstorm) जिल्ह्यातील दोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर तातडीने सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली.

सध्या दोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सर्वाधिक नुकसान राजुरा आणि पोंभुर्णा तालुक्यांत झाले.

मागील वर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. तीन ते चारदा पूरपरिस्थिती निर्माण झाली. पावसाने खरीप हंगामावर पाणी फेरले गेले. त्यामुळे रब्बी हंगामावरच शेतकऱ्यांची भिस्त होती.

जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा, गहू, ज्वारी यांसह अन्य पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. रब्बी हंगामात वातावरण चांगले असल्याने पीक उत्तम होते. अनेक भागांत पिके काढणी सुरू आहे. काही ठिकाणी पिके काढून ती शेतात ठेवण्यात आली आहे.

यंदा पीक चांगले आल्याने शेतकरीही समाधानी होते. पीक काढणीनंतर हाती आलेल्या पैशातून कर्जाची परतफेड करू अशी आशा शेतकऱ्यांना होती. भारतीय हवामान खात्याने १७, १८ मार्च रोजी ऑरेंज, तर १९ ते २१ मार्चदरम्यान येलो अलर्ट जारी केला.

याच दरम्यान जिल्ह्यातील अनेक भागांत पाऊस झाला. नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाने महसूल विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू केले.

राजुरा, पोंभुर्णा तालुक्यांत सर्वाधिक पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाने जवळपास दोनशे हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. अन्य तालुक्यांत नुकसान झाले नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

कापणी केलेले पीक भुईसपाट

राजुरा, कोरपना, गोंडपिंपरी आणि पोंभुर्णा तालुक्यांत गारपीट झाली. रब्बी पिकांना गारपिटीचा तडाखा बसला. कापूस, तूर, हरभरा, गहू,ज्वारी पीक जागेवरच मातिमोल झाले. राजुरा तालुक्यातील गोवरी परिसरात बोरासारख्या गारा पडल्या.

त्यामुळे कापणी करून ठेवलेले पीक भुईसपाट झाले. पिकाला कोंब अंकुरण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरवला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT