Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : देशात अवकाळी पावसाने नुकसान; राज्यांनी अहवाल पाठवले नाहीत: केंद्र सरकार

रब्बी हंगामात गव्हाखाली सर्वाधिक क्षेत्र असते. यंदा ३४३ लाख हेक्टरवर गव्हाची लागवड झाली.

Team Agrowon

Unseasonal Rain Crop Damage : काही राज्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी गव्हाला फटका बसला. मोहरी आणि हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात काढणी झाली.

तर फळपिकांना काही ठिकाणी गारपिटीचा फटका बसल्याची माहिती आहे. राज्यांनी अद्याप नुकसानीचे अहवाल पाठवले नाहीत. अहवाल आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल, असे केंद्राने स्पष्ट केले.

रब्बी हंगामात गव्हाखाली सर्वाधिक क्षेत्र असते. यंदा ३४३ लाख हेक्टरवर गव्हाची लागवड झाली. तर केंद्राने यंदा १ हजार १२२ लाख टन गहू उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवले आहे. पण महत्वाच्या गहू उत्पादक राज्यांमध्ये वादळी पाऊस झाला.

याचा गहू पिकाला काही ठिकाणी फटका बसल्याचे केंद्राने स्पष्ट केले. मोहरी आणि हरभरा पिकाचे जास्त नुकसान नाही. कारण ५० टक्क्यांपेक्षा अधिक पिकांची काढणी झाली. त्यामुळे होणारे नुकसान कमी आहे.

देशात ठिकठिकाणी गारपीट झाली. या गारपिटीमुळे फळबागांना मोठा फटका बसला. तसेच केळी आणि बटाटा पिकाचेही नुकसान होत असल्याचे अहवाल आहेत, असेही केंद्राने सांगितले.

देशातील २ लाख हेक्टरवरील गव्हाला वादळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याची शक्यता असल्याचे केंद्रीय कृषी सचिव पी. के सिंग यांनी सांगितले. पण पिकाचे जास्त नुकसान झाले नाही.

मोहरी आणि हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात काढणी झाली आहे. राजस्थान आणि हरियानातील काही भागात मोहरीची काढणी शिल्लक आहे. देशात ठिकठिकाणी गारपीट झाली. त्यामुळे स्थानिक फरबागांना मोठा फटका बसला, असेही सिंग यांनी सांगितले.

पाऊस आणि गारपिटीमुळे भारतीय हवामान विभागाने झारखंड, बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब आणि हरियानातील शेतकऱ्यांना पिकाची काढणी पुढे ढकलण्याचा सल्ला दिला.

आसाममधील शेतकऱ्यांना फळांची काढणी थांबवून काढणी केलेल्या फळांची सुरक्षित जागी साठवण करण्याचा सल्ला देण्यात आला. सिक्कममधील शेतकऱ्यांनी मक्याची तर पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांनी तागाची लागवड पुढे ढकलावी.

शेतकऱ्यांनी साचलेले पाणी बाहेर काढावे, फळबागांना आधार द्यावा, भाजीपाला पिकांनाही आधार द्यावा, असा सल्ला देण्यात आला.

वादळी पावसाने काही नुकसान झाले आहे. पण राज्य सरकारांकडून आम्हाला अद्याप नुकसानीचे अहवाल प्राप्त झाले नाहीत. शेतकऱ्यांना नुकासानभरपाई देण्यासाठी राज्य सरकारे राज्य आपत्ती निवारण निधीचा वापर करतात. राज्य सरकारांनी अहवाल सादर केल्यानंतर केंद्र सरकार राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत करेल
कैलाश चौधरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री
देशातील महत्वाच्या गहू उत्पादक पंजाब, हरियाना, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मध्ये दोन दिवस पाऊस झाला. काही भागातील पिकांना या पावसाचा फायदाही झाला. या राज्यांमधील दोन लाख हेक्टरवर वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याची शक्यता आहे. राज्य सरकारांकडून नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. पुढील दोन ते तीन दिवसात केंद्राला अहवाल प्राप्त होतील.
पी. के. सिंग, केंद्रीय कृषी सचिव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT