Crop Damage Agrwoon
ॲग्रो विशेष

Crop Damage : सततच्या पावसाने पिकांचे नुकसान

Heavy Rain : मागील काही दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे मोताळा तालुक्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Buldana News : मागील काही दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे मोताळा तालुक्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानाची पाहणी करून तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांनी केली आहे.

मंगळवारी (ता. ३) तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांसह त्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन शासनाकडे निवेदन पाठवले. याबाबत म्हटले, की मोताळा तालुक्यात सततच्या पावसामुळे कपाशी, सोयाबीन, मका, मूग, उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावला गेला आहे. वाढलेली महागाई, निसर्गाचा प्रकोप, शेतमालाला मिळणारा कमी भाव, यामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. मागील वर्षीच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही.

शेतीमालाला भाव नाहीत. आता कापणीवर आलेल्या पिकाचे सध्याच्या मुसळधार पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे अत्यावश्यक आहे.

शासनाने ई- पीक पाहणीची सुविधा उपलब्ध करून दिली असूनही अनेक वेळा तांत्रिक अडचणी येत आहेत. तरी प्रशासनाला पीक नुकसान पाहणीचे आदेश द्यावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT