Banana Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Damage : वादळ, पावसामुळे अकोटला केळीचे मोठे नुकसान

Unseasonal Rain Update : अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात रविवारी (ता.२१) रात्री साडेदहाच्या सुमारास आलेल्या वादळ, पावसामुळे केळीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे कोलमडून पडली आहेत.

Team Agrowon

Banana Crop Damage In Akola : अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यात रविवारी (ता.२१) रात्री साडेदहाच्या सुमारास आलेल्या वादळ, पावसामुळे केळीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे कोलमडून पडली आहेत. कापणीला आलेले केळीचे घड तुटून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.

अकोट तालुक्यातील पणज, अकोलखेड महसूल मंडळातील गावांमध्ये रात्री दहा ते साडेदहा दरम्यान जोरदार वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. प्रामुख्याने वाऱ्याचे वेग मोठा असल्याने केळीच्या बागेत झाडे उन्मळून पडली.

गेल्या काही दिवसांपासून आधीच उष्णतापमान प्रचंड वाढलेले असून बागांना फटका बसतो आहे. त्यातच रविवारी जोरदार आलेल्या वादळानेही नुकसान केले आहे. या दोन्ही मंडळांत हजारो एकरात केळीची लागवड झालेली आहे. काही केळीमधून उत्पादन सुरू झालेले आहे.

सध्या केळीचे दर कमी असल्यानेही आधीच शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. त्यातच आता उष्णतामान व त्यापाठोपाठ वादळाने केळीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्याची मागणी केली जात आहे.

रविवारी (ता. २१) रात्री या भागात मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडाटासह वेगाचा वारा व पाऊस पणज आणि अकोलखेड मंडळात झाला. केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी, महसूल विभाग व विमा कंपनीने तातडीने पंचनामे करावेत, अशी नुकसानग्रस्त शेतकरी मागणी करीत आहेत.
गजानन अकोटकर, पणज, ता. अकोट, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Advisory: पिकांमधील अन्नद्रव्ये कमतरता, कीड-रोग निदानासाठी प्रक्षेत्र भेट

Rural Healthcare Development: आरोग्य सेवेला बळकटी

Supreme Court: निवडणूक आयुक्तांना कायदेशीर संरक्षण देणाऱ्या कायद्याची सुप्रीम कोर्टाकडून पडताळणी; केंद्र सरकारला नोटीस

Vegetable Cultivation: नगदी वाल पिकामुळे बळीराजाला आधार

UMED Mission: उमेद अभियानात काम करणाऱ्या महिलांना आता नवी ओळख, 'ग्रामसखी' या नावाने ओळखले जाणार

SCROLL FOR NEXT