Agriculture Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain Compensation: अतिवृष्टीमुळे नुकसान; ४२ हजार शेतकऱ्यांना ५५६८ कोटींची मदत मिळणार!

Government Aid: ऑक्टोबर २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. नांदुरा तालुक्यातील ४२ हजार १८१ शेतकऱ्यांना ५५ कोटी ६८ लाख रुपयांची मदत लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

Team Agrowon

Buldana News: मागील खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस तसेच इतर शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीसाठी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर आहे. त्यानुसार नांदुरा तालुक्यातील ४२ हजार १८१ शेतकऱ्यांना त्यांच्या बाधित झालेल्या एकूण ४० हजार ७९० हेक्टर क्षेत्रासाठी ५५ कोटी ६८ लाख २७ हजार रुपयांचा निधी लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यात विशेष करून घाटाखालील तालुक्यात खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला होता. त्यात नांदुरा तालुक्यात १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जिरायती पिकांचे ४० हजार ६९७ हेक्टर क्षेत्रात तर १३२ शेतकऱ्यांच्या ३३ हेक्टर क्षेत्रातील फळ पिकांचे नुकसान झाले होते. दोन्ही मिळून ४२ हजार १८१ शेतकऱ्यांचे ४० हजार ७९० हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे नुकसान झाले होते.

पावसामुळे शेतातील सोंगून ठेवलेले सोयाबीनच्या गंज्या, वेचणीस आलेला कापूस खराब होण्यासाठी नदी-नाल्यांना पूर आल्याने सोयाबीनच्या गंजी अक्षरशः वाहून गेल्या होत्या तसेच अनेकांची जमीन खरडून गेली होती. अशावेळी त्याच वेळेस शासनाने तत्काळ मदत देणे अपेक्षित होते.

परंतु त्या वेळी केवळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आता मागील वर्षीच्या अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने शासन निर्णय काढून शेती पिकाच्या नुकसानीपोटी मदत देण्याचे जाहीर केले आहे. १३८०० रुपये प्रती हेक्टरप्रमाणे ही मदत वाटपाची प्रक्रिया असणार आहे.

तालुकानिहाय असे होणार निधीचे वाटप

तालुका शेतकरी संख्या क्षेत्र हेक्टर अपेक्षित निधी लाखात

बुलडाणा ९०१ ६१२.३४ १३६.८६

चिखली ३३८२ २६१२.५० ३५७.१९

मोताळा ४८१०२ ३६१७७.७६ ४९३२.९८

मलकापूर २९९६२ ३२५७६.०० ४४४१.९७

खामगाव ३९९९२ ३३९०६.५० ४६३७.८९

नांदुरा ४२१८१ ४०७९०.०० ५५६८.२७

जळगाव (जा) २७८९९ ३०८१५.०० ४१९०.८४

संग्रामपूर ३६९४० ३७२९३.०० ५२२०.६३

मेहकर ९०६ ६५८.४५ ९०.४२

सिंदखेड राजा १५९५ ९९९.०० १४८.१९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT