Monsoon Rain 2026: मॉन्सूनच्या दमदार सरींची अद्यापही प्रतीक्षा असतानाच देशातील खरीप पेरणीने गेल्यावर्षीच्या तुलनेत १.७ टक्क्यांनी आघाडी घेतली आहे. देशात १९ जूनपर्यंत खरीप पेरणी ११९.९० लाख हेक्टरवर पोहचली असून गेल्यावर्षी याच कालावधीत ११७.९५ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. .परंतु कापूस, सोयाबीन, उडीद, या पिकांच्या पेरणीखालील क्षेत्र अद्यापही कमीच असून मॉन्सूनच्या दमदार पावसानंतर वाढ होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. .१९ जूनपर्यंत कडधान्यांची पेरणी ७.२१ लाख हेक्टरवर पोहोचली असून, ती मागील वर्षी याच दरम्यान ६.३९ लाख हेक्टर होती. मात्र तेलबिया पिकांचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या ८.११ लाख हेक्टरच्या तुलनेत ७.२४ लाख हेक्टरवर आहे. तर भरडधान्ये पिकांच्या पेरणीने आघाडी घेतली असून क्षेत्र १२.४३ लाख हेक्टर झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ते ९.८२ लाख हेक्टर होते. त्यामुळे भरडधान्य पिकांनी गेल्यावर्षीच्या तुलनेत २६.५ टक्क्यांहून आघाडी घेतली आहे..कापूस आणि सोयाबीन पिछाडीवरदेशात आत्तापर्यंत कापूस पिकाच्या क्षेत्र सर्वाधिक पिछाडीवर असल्याचे दिसून आले आहे. प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये मॉन्सूनची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे १९ जूनपर्यंत कापसाची लागवड १७.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली असून गेल्यावर्षी याच कालावधी ती २२.८२ लाख हेक्टर होती. म्हणजेच सुमारे २५ टक्क्यांनी कापूस लागवड पिछाडीवर आहे..Monsoon Update: मॉन्सून पुढे सरकला; राज्यात पावसाचा अंदाज.जून महिना संपत आलेला असतानाही सोयाबीन पेरणीने पावसाच्या तुटीमुळे गती घेतलेली नाही. देशात सोयाबीनची पेरणी १.३० लाख हेक्टर झाली असून गेल्यावर्षी २.५० लाख हेक्टरच्या तुलनेत पिछाडीवर आहे. परंतु तेलबिया पिकांमध्ये भुईमूगाचा पेरा आघाडी आहे. भुईमूगाचे क्षेत्र ५.२५ लाख हेक्टर पोहचले असून गेल्यावर्षी ५.०९ लाख हेक्टरवर पेरा झाला होता..तुरीला पसंतीएल निनोच्या प्रभावामुळे मॉन्सून हंगामात कमी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकरी कडधान्य पिकांना पसंती देत आहेत. कडधान्यांमध्ये तूरीचा पेरा १.६१ लाख हेक्टर पोहचला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत तुरीचा पेरा १.५९ लाख हेक्टर होता. .तसेच मूग लागवडीखालील क्षेत्राने आघाडी घेतली आहे. मुगाचा पेरा ४.०८ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले असून गेल्यावर्षी याच दरम्यान २.८६ लाख हेक्टरवर होता. परंतु उडीदाचे क्षेत्र मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत पिछाडीवर आहे. उडदाची पेरणी ०.६२ लाख हेक्टरवर पोहचली असून गेल्यावर्षी ०.९८ लाख हेक्टरवर झाली होती..मक्याची आघाडीदेशात मक्याची पेरणीनेही आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मक्याच्या पेरणीखालील क्षेत्र ५.६९ लाख हेक्टरवर पोहचलं असून गेल्यावर्षी याच कालावधीत ५.३४ लाख हेक्टर होती..भरडधान्यांकडे कलभरडधान्यांच्या पेरणीत यंदा बाजरीने आघाडी घेतली असून ४.०५ लाख हेक्टरवर आघाडी घेतली आहे. गेल्यावर्षी बाजरीखालील क्षेत्र याच कालावधीत २.१४ लाख हेक्टर होते. तर ज्वारीची पेरणी १.७४ लाख हेक्टरपर्यंत पोहचली असून गेल्यावर्षी १.४० लाख हेक्टर होती. तसेच नाचणीच्या पेरणीने आघाडी घेतली असली तरी ती तुलनेने पिछाडीवर दिसत आहे. नाचणीचे क्षेत्र ०.३१ लाख हेक्टरवर पोहचले असून गेल्यावर्षी ०.२७ लाख हेक्टरवर पोहचले होते..भात आणि ऊस खरीपातील प्रमुख अन्नधान्य पीक असलेल्या भाताची लागवड १२.३६ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली असून, गेल्या वर्षी हे क्षेत्र ८.०९ लाख हेक्टर होते. तर खरीपातील ऊस लागवडीत आघाडी आहे. ऊसाचे क्षेत्र ५७.३१ लाख हेक्टरवर पोहोचले असून गेल्या वर्षी याच कालावधीत ते ५६.६४ लाख हेक्टर होते. .Waiting For Rain: पावसाच्या प्रतीक्षेत खरीप हंगामाची चिंता.दरम्यान, देशातील मॉन्सूनचा प्रवास रेंगाळल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. परंतु आता मॉन्सूनच्या प्रवासाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने मॉन्सून आगेकूच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पेरणी खालील क्षेत्र आघाडी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.