Land Acquisition Compensation : शेतकऱ्यांना मिळेना हक्काचा मोबदला

Highway Project : भूसंपादन विषयक अप्पर जिल्हाधिकारी लवादाचा निर्णय जिल्हा न्यायालयाने कायम केला. परंतु राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने सदर प्रकरण उच्च न्यायालयात नेले.
Land Acquisition
Land Acquisition Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग तसेच वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग तालुक्यातून जातो. महामार्गासाठी सहा गावातील ८३.०९३६ हेक्टर तर रेल्वेमार्गासाठी १६ गावांतील १३१.०६१ एकर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले. मात्र मोबदला देताना शासनाने भेदभाव केल्याचा

भूसंपादन विषयक अप्पर जिल्हाधिकारी लवादाचा निर्णय जिल्हा न्यायालयाने कायम केला. परंतु राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने सदर प्रकरण उच्च न्यायालयात नेले. त्यामुळे शेतकरी शासनाच्या उदासीनतेबद्दल रोष व्यक्त करीत आहेत. भूसंपादन केल्यानंतर एकरी ४ लाख रुपये म्हणजे ४५० रुपये चौरस मीटरप्रमाणे पैसे देण्यात आले. परंतु गावाच्या लगत असलेल्या जमिनीला दोन हजार रुपये चौरस मीटरप्रमाणे पैसे मिळावे, अशी मागणी आहे.

Land Acquisition
Land Acquisition : निम्नतेरणाची उंची वाढविताना भूसंपादनाला विरोध करणार

शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी उच्च न्यायालयात दाखल केले आहे.महामार्ग व रेल्वेमार्ग विकासासाठी महत्त्वपूर्ण असले तरी शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पात गेल्यामुळे तालुक्याचे अर्थकारण तर गडबडणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना वाढीव मोबदल्यासाठी प्रशासन, शासन व न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहे.

Land Acquisition
Land Acquisition Compensation : भूसंपादन मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना त्रास नको

या गावांतील गेल्या जमिनी

उमरखेड तालुक्यात राष्ट्रीय महामार्गासाठी ८३.०९३६ हेक्टर भूसंपादन करण्यात आले. यात चिल्ली, सुकळी, नागेशवाडी, उमरखेड, अमानपूर, मारलेगाव या गावातील जमिनी संपादन करण्यात आल्या. रेल्वेमार्गासाठी १४१.३७२ हेक्टर जमीन संपादित झाली.

यामध्ये दत्तनगर, संगमचिंचोली, मारलेगाव, बिटरगाव (खु.), उमरखेड, दहागाव, तरोडा, कैलासनगर, कळमुला, कुपटी, नागापूर, पळशी, दिवटपिंपरी, मुळावा, पाहुनमारी व बेलखेड या १६ गावात भूसंपादन करण्यात आले. आता शक्तिपीठ महामार्गासाठीही तालुक्यातील १३१.०६१ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. त्यामध्ये सुकळी, चिल्ली, नागेशवाडी, बेलखेड, दहागाव व आमला या गावांचा समावेश आहे.

शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसून हा विकास होत आहे. शेकडो वर्षे सांभाळलेल्या शेतीचे एका झटक्यात भूसंपादन झाले. लवाद व न्यायालयाने निकाल देऊनसुद्धा शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळत नाही. म्हणजे शासन शेतकऱ्यांना मोबदला देण्यासंदर्भात सकारात्मक नसल्याचे दिसत आहे.
- सुरेंद्र कोडगीरवार, शेतकरी, उमरखेड.
रेल्वेमार्गात भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने दिलेली मदत अत्यंत अल्प आहे. सन २०१८ मध्ये भूसंपादन झालेल्या जमिनीचे अद्याप पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मागणी केलेला वाढीव मोबदला त्वरित देण्यात यावा.
- संजय बिजोरे, शेतकरी, मारलेगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com