Monsoon Update : मॉन्सूनचा वेगवान प्रवास; मुंबई गाठली, संपूर्ण मराठवाडा व्यापला, विदर्भात वर्ध्यापर्यंत मजल
IMD Monsoon Latest Update : सोमवारी (ता.२२) मॉन्सूनने पुण्यासह मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या काही भागापर्यंत मजल मारली होती. त्यानंतर मॉन्सूनने वेगाने प्रवास करत अवघ्या २४ तासांत मॉन्सूनने मुंबईसह विदर्भातील वर्ध्यापर्यंत मजल मारली आहे.