Dairy Livestock Agrowon
ॲग्रो विशेष

Livestock Price : दुभत्या पशुधनांचे दर २५ टक्क्यांनी घटले

Dairy Livestock Update : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याने जनावरे जगवण्याचे संकट दूध उत्पादकांवर ओढावले आहे. चारा, पाणी टंचाईचा परिणाम बाजारातील जनावरांच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती गंभीर असल्याने जनावरे जगवण्याचे संकट दूध उत्पादकांवर ओढावले आहे. चारा, पाणी टंचाईचा परिणाम बाजारातील जनावरांच्या खरेदी-विक्रीवर झाला आहे. दुभत्या जनावरांचे दर वीस ते तीस हजारांनी खाली आले आहेत. शिवाय बाजारात दर मिळत नसल्याने खरेदी-विक्रीही कमी झाली असून गाई-म्हशी, बैलांच्या नावाजलेल्या बाजारातही आवकेत मोठी घट झाली आहे. राज्यभरातील ही स्थिती चिंताजनक आहे.

राज्यात नगर, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी शेतीला पूरक जोड व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाला प्राधान्य देत आहेत. गेल्या काही वर्षांपासून दुधाला पुरेसा दर नसल्याने सातत्याने पशुपालन अडचणीत आहे. संकटावर मात करत पशुपालन करणारे शेतकरी यंदा दुष्काळ, पाणी, चारा टंचाई, दुधाचे पडलेले दर आणि पशुखाद्याचे वाढते दर यामुळे अडचणीत आहेत.

यंदा दुष्काळी स्थितीमुळे तसेच दूध व्यवसाय परवडणारा नसल्याने दुभती जनावरे विकण्याकडे कल असल्याचे दिसून येत आहे. मात्र बाजारात खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याने दुभत्या जनावरांच्या दरात वीस ते तीस हजारांनी (२० ते २५ टक्के) घट झाली आहे. दुभत्या गाई, म्हशींसाठी प्रसिद्ध असलेल्या घोडेगाव (ता. नेवासा), लोणी (ता. राहाता) यासह अन्य गाई-म्हशीच्या बाजारात खरेदी-विक्रीवर परिणाम दिसत आहेत.

घोडेगावला मागील महिन्यात ४१८ म्हशीची, ५०० गाईंची, सहाशे शेळ्या, व ८०० शेळ्याची खरेदी-विक्री झाली. अन्य वेळी साधारणपणे सातशेच्या जवळपास गाई, सहाशेच्या जवळपास म्हशींची खरेदीविक्री होत असते. दुभत्या जनावरांसोबत सध्या शेळ्या, मेंढ्याचीही विक्री होत असून शेळ्या, मेंढ्याचेही दर नेहमीच्या तुलनेत कमी झाले आहेत, असे बाजार समितीतून सांगण्यात आहे.

यावर्षी पिण्याच्या पाण्याची, चाऱ्याची तीव्र टंचाई असल्याने जनावरे जगवणे अवघड आहे. त्यातच उन्हाळा असून व दुधाला मागणी असूनही गाईच्या दुधाला पुरेसा दर मिळत नाही. त्यामुळे गाय विक्रीला आणली आहे. गाईच्या दरात बरीच घट झाल्याचे जाणवतेय.
अलमभाई शेख, दूध उत्पादक शेतकरी देवगड फाटा, ता. नेवासा, जि. नगर
अनेक दिवसांपासून दूध व्यवसाय करतो. मात्र यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. महागडी जनावरे संभाळणे अवघड आहे. चारा, पाणी टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय मोडकळीस आला आहे. दुधाला दर नाही आणि सरकारी पातळीवर दखल घेतली जात नाही. त्यामुळे दुभती जनावरे विकण्याची वेळ आली आहे.
रमेश कोंडीराम पठाडे, ढोरेगाव, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

सध्याचे दुभत्या जनावरांचे दर (कंसात पावसाळ्यातील साधारण दर)

- दुभत्या संकरित गाय : ४० ते ६० हजार (८० हजार ते १ लाख)

- दुभत्या म्हशीचे दर : ९० हजार ते १ लाख (१ ते सव्वा लाख)

- बैलाचे दर : सध्या अल्प आवक (४० हजार ते ८० हजार)

भाकड जनावरे तर मातीमोल...

उन्हाळ्यात, दुष्काळी स्थितीत अधिक अडचण असते ती भाकड जनावरे संभाळण्याची. दररोज एका जनावरांवर दर दिवसाला साधारणपणे शंभर रुपयांपेक्षा अधिक खर्च करावा लागतो. यंदा बहुतांश भागात चारा, पाण्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. काही पशुपालक आर्थिक तोटा सहन करुन भाकड जनावरे संभाळतात, मात्र ज्यांना शक्य नाही ते विक्री करतात. बाजारातही भाकड जनावरांना कोणी विचारत नाही. गोवंशीय जनावरांसाठीचा कायदा यामुळे बाजारात न विकता घरीच भाकड जनावरे विकली जात आहे. त्यांची किंमत मात्र यंदा मातीमोल होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Compensation: कृषिमंत्री भरणे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची दिली ग्वाही

Marathwada Rain: तीन जिल्ह्यांतील १९८ मंडलांत पावसाची हजेरी

Nanded Heavy Rain: मुखेडला पाच नागरिकांसह ५२ जनांवरांचा मृत्यू

Agriculture Technology: विदर्भातील दुर्गम भागात कृषी तंत्रज्ञान विस्तारासाठी प्रयत्न

Agriculture Technology: भात रोप निर्मितीचे नवे तंत्र ठरतेय फायद्याचे...

SCROLL FOR NEXT